या म्हतार्या आजीची कहाणी ऐकून तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

0

पैसा पुढे हरलेली माणुसकी . सामान्य जिवन जगत असताना प्रत्येक गाेष्ट पैसात माेजली जाते काेणतेही गाेष्ट पैसा शिवाय हाेत नाही.पैसा पुढे प्रेम,माया माणुसकी या गाेष्टी खरंच दुरापास्त झाल्या आहेत . खरे पैसा हा व्यवहारा साठी लागताे माणुसकी जपण्या साठी फक्त तळमळ आणि प्रेम लागते . दुपारची कामा निमित्त सिव्हिल हाँस्पिटला गेलाे हाेताे काम आवरुन बाहेर पडलाे . . .

डाेक्या वरती सुर्य तळपत हाेता प्रंचड ऊन लागत हाेते . अंगाची लाही लाही हाेत हाेती . एक अंदाजे ७५ वर्ष वयाची आजी त्या रणरण त्या उणात त्या बसल्या हाेत्या . मला दिसताच माझी पावले त्याच्या दिशेने वळली तर अक्षय माझ्या मागे मागे हाेताच . काय आजी कुठुन आलीस .

बाबा कराड (सातारा)वरुन आले. आजारी हाेते म्हणुन सिव्हील ला अँडमीट व्हते .  त्यानी सांगीतले घरी जा .  आणि बाहेर काढले (एकदम रस्तावरच) पण पैस नाहित कसं जावु .  आणि मला चांलता पण येत न्हाय कराडात घर हाय स्वताच पण घरी जायला रिक्षा वाला १ हजार रू मागतुय .  कुठनं देऊ  इथच आता मरण. . .

म्हटल काेन आहे तुझा बराेबर . ती म्हणाली नवरा आहे त्या शाेधुन काढला ताेही बिचारा भाेळा भाबडा हाेताे .  म्हणाला साहेब आमी गरीब माणसं . एका हाटेलात काम करतु आणि जगतु घरी जायला पैस नाइत काय करु १५ दिवस रस्तावरच आहे .  लय विंनती केली सगळ्याना की घरा पर्यत्न साेडा म्हणुन .  पण सगळेच पैस मागत्यात . . .

आणि इथ साेय पण नाय काय रात्री लय गारठा हाय .  मरु या गारठ्याने . मी निशब्द हाेताे . . कारण डिजिटल इडियात जगताना माणुसकी पेक्षा पैसा ला जास्त किंमत आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले हाेते .  एका अँब्युलन्स वाल्या ला विचारले महाशय म्हणाले साहेब गाडी पेंशट साठी आहे या लाेका साठी नाही . मरु दे ना म्हतारी तुम्हाला काय पडलेय . . .

पुन्हा एेका रिक्षा वाल्याला विचारले साेडताेस का दादा . साेडताे  पण १२०० रु हाेतील .तडजाेड करुन त्याला कसा तरी १००० हजार रु तयार केला .  आजी ला सांगीतले जा हि रिक्षा साेडेल घरा पर्यत्न .ती म्हणाली लेकरा अरे पैस नाहित नाहितर कधीच गेले असते .  तिला म्हटले मी दिलेत त्याला १००० रु तुला तुझा घरा पर्यत्न साेडेल. तशी आजी चमकली . सावरली  म्हणाली चालता येत नाही तुम्ही सगळे मिळुन उचलुन ठेवा .

सर्वानी मिळुन तिला रिक्षात ठेवले . तिला घरी जाण्याचा आंनद काही वेगळाच हाेता . आणि रिक्षा कराड(सातारा )दिशेने रवाना झाली . ती आजी आता १तासात स्वताच्या घरी पाेहचेल त्या आजिला झालेला आंनद बघुन समाधन वाटले आणि पुन्हा एकदा जाणवले . . . .

॥ माणुसकी अजुन जिंवत आहे ॥ रवि बाेडके  यशाेधन ट्रस्ट,सातारा  9922424236

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!