स्वतः चा लहानसा ऊद्योग चांगला कि मोठ्या कंपनीतील नौकरी नक्की वाचा…..|

0

एका मोठ्या कंपनीच्या गेट समोर एक प्रसिद्ध समोसे विकणार्‍याचं हॉटेल होतं, मधल्या सुट्टित कंपनीचे जवळपास सर्व कर्मचारी तीथं जाउन समोसे खात असत. एकदिवस कंपनीचा मॅनेजर समोसे खाताखाता चेष्टा करायच्या मुडमध्ये आला !मॅनेजर समोसेवाल्याला म्हणाला, “अरे यार गोपाळ, तुझं दुकान तु फार चांगल्या प्रकारे maintain केली आहेस, पण तुला असं वाटत नाही का,तु तुझं टॅलेन्ट आणी वेळ समोसे विकण्यात वाया घालवतोयस? विचार कर तु माझ्यासारखं या कंपनीत काम केला असतास तर तुही माझ्यासारखा मॅनेजर असला असतास!”

या गोष्टीवर गोपाळने बराच विचार केला, अन् म्हणाला,”सर हे माझं काम तुमच्या कामापेक्षा कधीही चांगलं आहे,१० वर्षापुर्वी मी एका टोपलीत समोसे विकत होतो तेंव्हा तुम्हालाही नौकरी होती तेंव्हा मी महिना हजार रुपये कमवत होतो अन् तुम्हाला पगार होता २० हजार रुपये. या दहा वर्षात आपण दोघानी भरपुर मेहनत केली. तुम्ही सुपरवायजरचे मॅनेजर झालात, आणि मी टोपली पासुन ते या प्रसिद्ध दुकानापर्यंत!

आज तुम्ही महीना ४०००० रु.कमवता  आणि मी ८०००० रु. परंतु या गोष्टीमुळे मी माझ्या कामाला तुमच्याहुन श्रेष्ठ म्हणत नाही. हे तर मी माझ्या मुलासाठी म्हणतोय! जरा विचार करा सर मी तर फार कमी कमाईवर धंदा चालु केला होता, पण माझ्या मुलाला हे सारे कष्ट करावे लागणार नाहीत!माझं दुकान माझ्या मुलाला मीळेल ! मी जीवनात जी मेहनत केलीय त्याचा फायदा माझी मुलं घेतील! आणि तुमच्या मेहनतीचा फायदा तुमच्या कंपनीच्या मालकाची मुलं घेतील!

तुम्ही तुमच्या मुलाला डायरेक्ट तुमच्या पोस्टवर तर बसवु शकत नाही ना….त्याला शुन्यातुन सुरवात करावी लागेल.. आणि कार्यकाळाच्या शेवटी तो तुमच्या पोस्ट पर्यंत पोहचेंल..! आणि माझा मुलगा या मोठ्या धंद्यापासुन सुरवात करेल अन् त्याच्या कार्यकाळात फार पुढे गेलेला असेल!  आता तुम्हीच सांगा ! वेळ आणि टॅलेन्ट कोण वाया घालवतयं!

मॅनेजर साहेब २ समोस्याचे २० रु. देउन चुपचाप निघुन जातात…..!

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!