हा नवीन प्लॅन पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल जुग जुग ‘जिओ’..!!

0

हल्ली कोणत्याही सणासुदीला एक दिवस आधी शुभेच्छा देणारे आणि बोलण्यासाठी फक्त मिस्ड कॉल देणारे लोक गायब झाले आहेत, नाही का..?? हल्ली तासनतास फोन वर गप्पा मारणारे मात्र नक्कीच दिसतील. जे तुम्हाला कधीही फोन करत नव्हते ते  देखील तुम्हाला फोन करून तुमचा वेळ खात असतील.

एवढंच नाही तर हल्ली सायबर कॅफे चा वापरही थांबलाच आहे. काही सरकारी फॉर्म भरण्यापलिकडे सायबर कॅफे मध्ये कोणी जातही नाही. तासाला ५० – ६० रुपये ह्या दराने सायबर कॅफे मधली लूट पुरती थांबलीये. ह्या सगळ्याला जबाबदार स्मार्ट फोन्स आहत. आणि त्या नंतर आलेले इंटरनेट ची सर्विस देणारे. पण ही इंटरनेटची सर्व्हिस देखील महागच होती. 2G त्यातून त्यांचा स्पीड कमी. मग आलं 3G तेही महाग. आता 4G चा जमाना आणि अत्यंत स्वस्त असं इंटरनेट जे सर्वसामान्य माणसाला ही सहज परवडेल. इतकच काय तर भरताती कोणत्याही नंबर वर कॉल करण्यास एकही रुपया लागत नाही.

आता ही किमया मात्र भारताच्या नंबर वन मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सर्व्हिस देणाऱ्या ‘जिओ’ ची आहे. जिओ आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं..!! महिन्याला १४५₹ मध्ये रोजचे दीड GB इंटरनेट तेही 4G च्या स्पीडच.. मोठा पॅक ३९९ चा त्याचा ८४ दिवसांसाठी हाच लाभ. कॉम्प्युटर, लँड लाईनच मॉडेम असलेलं इंटरनेट, सायबर कॅफे, PCO, आणि मोठाली बिले… ह्या सगळ्यातून आपली मुक्ताताच झालीये.

रिलायन्स च्या जिओ ने मात्र बाकीच्या सर्विस देणाऱ्या कंपन्यांचं कंबरडच मोडलं आणि स्वतः ह्या क्षेत्रात उच्च स्थानी विराजमान झाले. ग्राहकांना काय हवं ह्याची नस त्यांनी बरोबर ओळखली आणि फक्त श्रीमंतांनाच परवडेल अशी सेवा भारतातील प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून दिली. दर वेळी काही न काही नवनवीन ऑफर्स बाजारात आणून जिओ आपले ग्राहक दिवसेंदिवस वाढवत आहेत. कधी कॉल स्वस्त, तर कधी हँडसेट, कधी पॅक स्वस्त तर कधी मोडेम. 4G फोन नसलेल्यांना सुद्धा नाराज केलं नाही. त्यांना 4G वापरायला दुसरी व्यवस्था मॉडेमच्या रूपाने करून दिली.

म्हणजे ग्राहकच देव ह्या उक्ती प्रमाणे त्या देवाला ओज नवीन भोग नैवेद्य चढवले जातायत. आता दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी मोबाईल रिचार्ज करायला पण सुट्टी मिळणार आहे. आता एकदा रिचार्ज केला की महिना सहा महिने नाही तर तब्बल एक वर्ष सगळं विसरून जा. म्हणजेच आपल्याला एक वर्षांचा डेटा आणि कॉल्लिंग पॅक मिलणार आहे.

१६९९ चं रिचार्ज केलं की सतत रिचार्ज करण्यापासून मुक्ती. एक काळ असा होता की पंधराशे आणि दोन हजार च टेलिफोन बिल आपण भरायचो तेही फक्त तासाभराच्या इंटरनेट सेवेसाठी. पण हे १६९९ आता वर्षभर ओजचे दीड GB इंटरनेट आपल्याला देणार.

इतक्यावरच जिओ थांबणार नसून 5G इंटरनेट सुद्धा लवकरच भारतात आणणार आहेत. 4G चा स्पीड आणि मिळणारी सेवा पाहता 5G खासच असणार.. रिलायन्सच्या ह्या नवीन प्रोजेक्टमुळे त्यांच्या शिरेचात मानाचा तुरा असेलच पण टेलिकॉम सेक्टरचे अनभिषिक्त सम्राट म्हणून देखी जिओलाच मान मिळणार हे नक्की..!! आहे की नाही हा ‘जुग जुग जिओ’ क्षण..??!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!