Loading...

हिरवी मिरची खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मला हो म्हणत्यात लौंगी मिरची.. म्हणत मिरची सारखी तिखट अभिनेत्री लचकत मुरडत नाचते. पण खरीखुरी हिरवी तिखट मिरची खरोखरीच सगळ्यांना नाचवतेही. मिरची लागली की ‘हा s s s हू’ करत पाण्याचा ग्लास आपण रिचवतो, तरीही जिभेवरचा तिखटपणा काही केल्या जात नाही. पण काहीही म्हणा मिरची नाही तर पदार्थाला चव नाही.. आपल्याकडे माणसांच्या स्वभावाला देखील मिरचीची उपमा देतात. कारण मिर्चीसारखे तिखट काहीच नाही. तोंडाची आग आग करत असली तरी ही मिरची मात्र फार गुणी असते हो..!!

गुणी म्हणजे खूपच गुणी.. विचारा आयुर्वेदाचार्यांना. तेही पटापटा सांगतील तुम्हाला तिचे सद्गुण..! एखाद्याला होणारी ऍसिडिटी सोडली तर मिरची आपल्याला कितीतरी रोगात उपयुक्त ठरते.. पाहूया कोणकोणत्या शारीरिक व्याधीत मिरची गुणकारी ठरते आणि कशी ते.

Loading...

१. स्वतःच्या शरीरासोबत वातावरण प्रदूषित करणारे पृथ्वीवरचे स्पिशिज म्हणजे सिगारेट तंबाखू खाणारी माणसे. ह्यांना सगळ्यात मोठा धोका असतो तो कॅन्सरचा. अशा लोकांना मिरचीचा ठेचा रोज खाऊ घालावा. शिक्षा म्हणून आणि औअहध म्हणून देखील. कारण मिरची मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंटस असतात. जी आपल्या शरीराला आतून साफ करतात. त्यामुळे कॅन्सर सारख्या रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो.

२. हिरव्या मिर्चीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्याला बऱ्याच रोगांपासून वाचवते. त्यासाठी मिरचीचे सेवन रोजच्या आहारात असल्यास हरकत नाही. तसेच ही मिरची चोंदलेले, बंद असलेले नाक झटक्यात मोकळे करते. कधी हिरव्या मिरचीचा वापर केलेला रस्सा खाऊन तर पहा.. कान नाक डोळे सगळेच मोकळे होतात की नाही..?

३. मिरची मध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. हाडे, दात आणि डोळ्यांसाठी सुद्धा हिरवी मिरचीतील व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते. म्हणून काही ही मिरची दाताने कचाकचा चावून खायची गरज नाही. वेगवेगळ्या पदार्थात घालावी म्हणजे व्हिटॅमिन सी शरीराला मिळतेच.

४. अर्थरायटीस च्या पेशंट्सनी हिरवी मिरची जरूर खावी. ज्यांना अंगदुखीचा त्रास होत असेल त्यांनी देखील हिरव्या मिरच्या घातलेले पदार्थ खावेत. शरीरास आराम मिळतो.

५. बारीक व्हायची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी सुद्धा हिरव्या मिरचीला प्राधान्य द्यावे. त्यात भरपूर फायबर असते जे वजन कमी करायला अत्यंत उपयुक्त असते. म्हणजे जास्ती फायबर असेल तर जास्ती वेटलॉस देखील होतो. म्हणून सांगतो , सडपातळ मिरची खाऊन मिरची सारखे सडपातळ व्हा..!!

Loading...

६. पाचन क्रिया सुधारण्यासाठी मिरची हे रामबाण औषध आहे. ज्यांना ऍसिडिटी होते त्यांनी मात्र डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मिरचीचे सेवन करावे.

७. मिरची रक्तातील गुठळ्या दूर करते. ह्या रक्ताच्या गुठळ्यांमुळे होणाऱ्या हृदरोगांमध्ये देखील मिरची गुणकारी ठरते.

आहेत की नाही ह्या जहाल मिरचीचे आश्चर्यचकित करणारे गुणकारी फायदे..? रोज रोज जॅम पोळी खाणाऱ्यांनी तर आवर्जून सगळ्या हिरव्या भाज्या आणि त्यासोबत हिरवी मिरची खाल्लीच पाहिजे. हिरव्या मिरचीच्या उत्तम पाककृतीही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. गोड, आंबट, कडू आणि तिखट चव देखील आहारात असावीच. आता मिरची आहे तर ती लागणारच तरीही आपण खावी बिनधास्त..!!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.