Loading...

स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणाने वाचविले शिवशाही मधील 17 प्रवाश्यांचे प्राण !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मित्रांनो शिवशाही आणि अपघात आता हे समीकरण काही नवीन राहिलेलं नाही , शिवशाही बस च्या अपघाताची एक एक घटना आपल्या कानावर पडतच असते अशीच एक घटना एका तरुणाच्या सतर्कत्यामुळे टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुर डेपोची नाशिक – कोल्हापुर  ही शिवशाही (एमएच- 09- एट-1876 ) गुरुवारी सकाळी सहा वाजता नाशिकवरुन कोल्हापुर कडे निघाली होती.

Loading...

ही शिवशाही बस नारायणगावच्या पुढे गाड़ी आलेली असताना जुन्नर येथील तरुण आलोक जंगम यांना शिवशाही बसच्या मागील डाव्या बाजुच्या चाकाचे बोल्ट निखळलेले असल्याचे निदर्शनास आले आलोकने गंभीर अपघाताचा धोका ओळखून सतर्कता दाखवत चालकाला या गोष्टीची कल्पना देण्यासाठी शिवशाहीचा पाठलाग सुरु केला.

भरधाव वेगात असलेल्या शिवशाहीला अखेर एकलहेरे गावाजवळ जीव धोक्यात घालून त्याने थांबविले. तोपर्यंत चाकाचे सहा बोल्ट पूर्ण निखळून गेले होते. चालक, वाहक व प्रवासी यांनी गाडीच्या खाली उतरुन  मागील चाकाची वस्तुस्थिती पाहिल्यावर अक्षरश: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.

Loading...

अश्या एका भयानक अपघातातुन या तरुणाने आपल्याला  वाचविले तो देवासारखा धावून आला असे शब्द प्रत्येक प्रवाशाच्या तोंडी होते, यावेळेस गाडीमधून 17 प्रवाशी प्रवास करत होते. स्टार मराठी परिवाराकडून आलोक जंगम यांच्या कार्याला सलाम.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : [email protected]

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.