23 मार्च राशी भविष्य : आज या ५ राशींवर असेल भगवान शंकरांची कृपा, जाणून घ्या आजचे राशी भविष्य…

मेष राश‍ी : आज नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. मित्रपरिवारांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंग – पांढरा.

वृषभ राश‍ी : आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. व्यापार आणि नोकरीत धनलाभ होईल. गरीबांना दानधर्म करा. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.

मिथुन राश‍ी : भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामा-धंद्यात उन्नती होईल. सरकारी कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.

कर्क राश‍ी : आजचा दिवस तुमच्यासाठी संघर्षमय राहील. घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पिवळा.

सिंह राश‍ी: भगवान श्री गणेशाची पूजा करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. कोर्ट-कचेरीची प्रलंबित कामं पूर्ण होतील. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. राजकीय क्षेत्रात यश येईल. आजचा शुभ रंग – लाल.

कन्या राश‍ी: कुटुंब आणि मित्रपरिवारांसोबत धार्मिकस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, संपूर्ण दिवस आनंदात जाईल. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.

तूळ राश‍ी : बॅंकिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात प्रगती होईल. नवीन कामाची योजना आखाल. कला आणि लेखन क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. कुटुंबात मतभेद होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होईल. आजचा शुभ रंग – हिरवा.

वृश्चिक राश‍ी : कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्त होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या प्रत्येक कामात यश आल्यामुळे, मन प्रसन्न राहील. लव्ह लाईफ उत्तम राहील. आजचा शुभ रंग – पांढरा.

धनु राश‍ी : कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. बाहेर फिरायला जाऊ शकता. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू शकता. पोटाचे विकार संभावतील. आजचा शुभ रंग – निळा.

मकर राश‍ी : नवीन व्यापारासंदर्भात विचार कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. इतरांशी व्यवहार करताना, मनावर नियंत्रण ठेवा. आरोग्य निरोगी राहील. गृहस्थजीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

कुंभ राश‍ी: राजकीय आणि आयटी क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश येईल. दाम्पत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकता. आजचा शुभ रंग – नारंगी.

मीन राश‍ी: आर्थिक लाभ होईल. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे, मन स्थिर राहील. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात यश येईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पिवळा.