आज या ३ राशींवर असेल गणपती बाप्पांची कृपा,जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

मेष – आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल असे श्रीगणेश सांगतात. 

वृषभ  – महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. धनलाभाची शक्यता. शारीरिक आणि मानसिक दृष्टी या उत्साही राहाल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. 

मिथुन – आज सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. घरात कुटुंबीयांचा विरोध राहील. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक व्यग्रता अनुभवाल.

कर्क – आज व्यापारात लाभाचे योग श्रीगणेश सांगतात. रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल.

सिंह – नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता.

कन्या- आपल्या व्यवसायात इतरांनापण धनलाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्बेत सांभाळून राहा. दूरस्थ स्नेह्यांकडून वार्ता प्राप्त होतील. 

तूळ- आळस आणि जास्त कामाचा भार यामुळे मनाची व्याकुळता राहील. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने आरोग्याला घातक अन्न ग्रहण करू नका.

वृश्चिक- सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्यापिण्याचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील.

धनु- आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. योजने प्रमाणे कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. 

मकर – कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. तरीही कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. तब्बेत चांगली राहील. त्या दृष्टीने बाहेरचे खाणे-पिणे टाळा.

कुंभ – विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. वडिलांकडून तसेच सरकार कडून लाभ होतील. खंबीर मनोबल असेल.

मीन – काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्या-पिण्याचे बेत कराल. आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने दैनंदिन काम पूर्ण कराल.