दहशतवाद्यांचे एनकाउंटर करत असताना एका मेजर सहित ५ जवान शहिद

0

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने कश्मीरमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. पुलवामापासून काही अंतरावर असलेल्या पिंगलान येथे दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची ठोस माहिती लष्कराकडे होती. पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी आज पहाटे २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवानांना वीरमरण आले.

शहीद जवानांमध्ये मेजर डी.एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सेवाराम, शिपाई अजय कुमार आणि हरी सिंह यांचा समावेश आहे. तर गुलजार मोहम्मद हा जवान जखमी असून त्याच्यावर 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय मुस्ताक अहमद या जखमी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.  

वीरमरण आलेले सर्व जवान हे 55 राष्ट्रीय रायफल्सचे आहेत. या घटनेनंतर मोर्चा सांभाळण्यासाठी पॅरा कमांडोंना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच 55 राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि एसओजीने कारवाई सुरू केली होती.

पिंगलानमध्ये रात्री 12 च्या सुमारास हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन 55RR, CRPF आणि SOG च्या जवानांनी एकत्र चालवले होते. ठोस माहिती मिळाल्यानंतरच हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. दहशतवादी लपल्याची शक्यता असलेला भाग पूर्ण बंद करण्यात आला.

मात्र गेल्या तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झालेला असून, भारतीय जवानांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनी घेरलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद याच संघटनेचेच आहेत. हे सर्व दहशतवादी आदिल अहमद डार याचेच सहकारी असल्याची माहिती मिळते आहे. 

भारतीय जवानांनी पिंगलान परिसराला सर्व बाजूंनी घेरले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याच आली आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर आसपासच्या परिसरात सुरक्षा यंत्रणांनी छापेमारी सुरू केली आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!