आज जैशच्या आतंकवादयाला पकडताना आर्मी मेजर सोबत आणखी ३ जवान शहीद..!!

0

१४ फेब्रुवारी च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवानांची चिता विझते ना विझते तो पर्यंत अजूनही जवान शहीद होत असल्याच्या बातम्या लाईन ऑफ कन्ट्रोल वरून येत आहेत. जैशच्या दहशतवाद्यांनी LOC जवळ पेरून ठेवलेली IED स्फोटके नाकाम करताना मेजर चित्रेश बिष्ट यांचा कालच दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या एका महिन्यावर लग्न येऊन ठेपलेले असताना.

आणि लग्नाचे निमंत्रण देत असतानाच त्यांच्या घरच्यांना त्यांच्या मुलाच्या मेजर चित्रेश बिष्ट ह्यांच्या शहिद होण्याची खबर मिळाली. पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचा ४० चा एकदा अजूनही वाढतच आहे. काल ४१ तर आज आणखी ४ जवान शहीद झाल्याची बातमी आहे.

पुलवामा आणि आसपासच्या परिसरात अजूनही जैशे मुहंमद चे दहशतवादी लपलेले असल्याच्या खबरींमुळे सेनेचे जवान सगळीकडे शोधाशोध करत आहेत. ह्या सर्च ऑपरेशनमध्ये काही घरात लपलेल्या जैशच्या मोठ्या दहशतवाद्यांचा सुगावा लागल्याने झालेल्या गोळीबारात आज पहाटे मेजर डी एस डोंडियाल ह्यांच्या समवेत, हेड कॉन्स्टेबल सेवा राम, शिपाई अजय कुमार आणि हरी सिंग असे चौघे शाहिद झाले. शिपाई गुलजार मुहम्मद ह्यांना देखील जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना आर्मीच्या बेस नंबर ९२ मधील हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आहे आहे.

ह्या झालेल्या चकमकीत काही काश्मिरी नागरिक मारले गेले मात्र ते दहशतवाद्यांना आपल्या घरात लपण्यास मदतच करत होते. सोमवारी म्हणजे आजच पहाटे लवकर आर्मीला मिळालेल्या माहितीनुसार ह्या घरात लपलेल्या JeM च्या कामरान आणि हिलाल ह्या दोन मोठ्या दहशतवाद्याना पकडण्यासाठी ही चकमक सुरू झाली होती.

मात्र ह्यात आपल्या जवानांना अद्याप यश मिळाले नसले तरी हे दोघे तिथेच जाळ्यात अडकलेले आहेत. हा कामरान पुलवामा हल्ल्याच्या काटातील महत्वाचा सूत्रधार आहे असे मानले जातेय. त्याच्या अटकेसाठी भारतीय सेने अजून प्रयत्नशील आहे. मात्र अजून एकही जवानाचा बळी न जाता हे दोघे हाती लागण्याकडे आणि पाकिस्तानला लवकरच सडेतोड उत्तर देण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!