सिंबा फेम अभिनेत्री सारा अली खानच्या आयुष्यातील या गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल !

0

कुणी तिच्या विलक्षण सौंदर्याचा वेडा आहे तर कुणी तिच्या अप्रतिम कौशल्याचा. जिच्याबद्दल असंही म्हटलं जाते कि सौंदर्या आणि बुद्धीचे एक आगळे-वेगळे मिश्रण आहे. शीर्षकावरून तुम्हाला कळलंच असेल कि मी कुणाबद्दल बोलतोय. सारा अली खान. आपल्या पहिल्याच “केदारनाथ” या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये दमदार धडक देणाऱ्या कित्येक चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. चला तर जाणून घेऊया तिच्या आयुष्याबद्दल काही नवलाच्या गोष्टी.

तिचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ रोजी मुंबई मध्ये झाला. साराचे वडील सैफ अली खान बॉलीवूडचे मोठे कलाकार आहेत आणि आई अमृता सिंह यांचा सुद्धा सिनेजगातील प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. तिच्या आजोबाचे नाव मन्सूर अली खान तर आजी शर्मिला टागोर आहे. बेसेन मोन्तेसरी शाळेतून तिने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे.

साराला लहानपणापासूनच नाचण्यात आवडत होती वरून ती शाळेत आणि कॉलेज मध्येही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची. अमृतालाही साराच्या लहानपणीच तिच्यामध्ये “एक अभिनेत्री” दिसली होती. साराचे आयुष्य आनंदात जात असताना सैफ-अमृताच्या नात्याला काळी नजर लागली आणि त्यांनी घटस्फोट झाला. अमृताने निर्णय घेतला कि ती साराला आपल्याकडेच ठेवेल आणि सैफकडे जाऊ देणार नाही आणि हीच इच्छा साराची होती.

त्यानंतर अमृताने चित्रपटात काम करणे बंदच केले. त्यांची इच्छा नव्हती कि साराचा सांभाळ कुणी दाई करेल. सोबतसोबत सारा आपले वडील सैफ आली खान सोबतसुद्धा जवळीक बनवून जगली. फक्त बोललाच नव्हे तर साराची तिच्या वडिलांशी चांगली बोन्डिंगसुद्धा आहे. वयाच्या सोळाव्या वर्षीच सारा “हेल्लो” मेगझीनच्या पहिल्या पानावर झळकली.

अभ्यासातही गुणी असणाऱ्या साराने कोलंबिया विश्वविद्यालयातून आपले पदवी घेतली. त्याकाळात तिने खूप वजनही वाढविले होते. जवळपास ९५ किलो पण तिच्यावर सिनेजगताचे इतके वेड होते कि तिने ते वजन कमी करून आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि तिला पहिली संधी मिळाली ती अभिषेक कपूरच्या “केदारनाथ” चित्रपटात. या चित्रपटातील भूमिकेमुळे आणि आपल्या आकर्षक सौंदर्यामुळे सारा अली खानच्या चाहत्यांच्या यादीत फक्त वृद्धी आणि वृद्धीच झाली आणि मग त्यात भर पडली ती रोहित शेट्टीच्या “सिम्बा” चित्रपटामुळे आणि जर वैयक्तिक बोलायचं झालं तर सारा अजूनही “सिंगल” आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!