अभिनेत्री तापसी पन्नू ने नागपूर हत्याकांड वरून कबीर सिंग च्या दिग्दर्शकाला खडसावलं !

0

चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली होती प्रेम करायचं आणि जमलं प्रेम तर खुश राहायचं नाहीतर प्रेमात गेम करायचा. हे सहसा प्रेमाची व्याख्या सर्वत्र प्रचलित आहे. प्रेम म्हणजे गुन्हा आहे काय ? अस म्हणणारी मंडळी जेव्हा प्रेम जळतं तेव्हा त्याच प्रेमात प्रेम करण्यात आलेल्या माणसाला ही जाळलं जातं. ही जरा खूप दुःखद बाब. नागपूर मध्ये प्रेयसीच्या चरीतत्रावर संशय घेऊन एका तरुणाने तिचा खून केला आहे. मग पुन्हा साधा प्रश्न पडायला लागतो की खरचं प्रेम होतं का ? खरं प्रेम यालाच म्हणतात का ?

सध्या कबीर सिंग हा चित्रपट ही सध्या खूप गाजत आहे. त्याच्या दिग्दर्शक यांनी मागे कॉमेंट केली होती. आणि त्यावर अनेक लोकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. यात अभिनेत्री तापसी पन्नू ही सुद्धा आघाडीवर दिसत आहे. तिनं ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. आणि त्यावर कबीर सिंग चित्रपटच्या दिग्दर्शक ला लक्ष केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आजकाल सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहाला मिळते. ती समाजातील प्रत्येक घटेनवर बिनधास्तपणे आपले मत मांडताना दिसते आणि अनेक वेळा ट्रोलही होते. नुकताच ‘कबीर सिंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना टोमणा मारत तापसीने एक ट्विट केले होते. त्या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी तापसीला ट्रोल केले आहे.

काही दिवसांपूर्वी चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या १९ वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यावर तापसीने एक ट्विट केले होते. बहुतेक ते ऐकमेकांच्या प्रेमात असणार आणि हे प्रेम सिद्ध करण्यासाठी हे कृत्य केले असणार असे तापसीने ट्विटमध्ये लिहिले होते. तापसीने हे ट्विट कबीर सिंगचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना अप्रत्यक्षपणे टोमणा मारण्यासाठी केल्याचे म्हटले जात आहे. संदीप यांनी एका मुलाखतीमध्ये कबीर सिंगचे समर्थन करत प्रेमामध्ये सगळं काही माफ असते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे या घटनेवरील तापसीचे ट्विट हे संदीप यांना मारलेला टोमणा असल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपट माध्यम हा खरोखर समाजाचा आरसा आहे. पण आरसा आहे म्हणून त्याचा गैरवापर व्हायला नको. समाजाला जगण्याची चालना मिळाली पाहिजी असा चित्रपट व त्यातला संदेश असावा. तापसी ने केलेल्या ट्विट ची एक बाजू तपासली तर समजतं की तिचं म्हणणं ही योग्य आहे. आणि दुसरी बाजू तपासली की वाटतं जे खरं आहे ते पचवण्याची ताकत समाजाने ठेवावी. खरं असून काय तोटे काय फायदे होतात हे दाखवलेलं ही पाहायला हवं.  प्रेम प्रकरण सध्या खूप वेगवेगळ्या वळणावर दिसत आहे. त्यात कितीतरी खून व वार यांसारख्या गोष्टी घडत असताना दिसून येत आहे. यावर कायदा व सुव्यवस्था यांनी कडक नियम करून योग्य कारवाई केली तर कदाचित इथून पुढे तरी ह्या गोष्टी आपल्याला तुरळक दिसून येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!