Loading...

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेसचा पाठिंबा?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला पार पडल्या. मतमोजणीमध्ये शिवसेनेने अनपेक्षित मुसंडी मारल्याचे प्राथमिक कलांनुसार दिसून येत आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ५० ते ६० जागा मिळतील, असे एग्जिट पोल्समध्ये अंदाज व्यक्त करण्यात येत होते. मात्र त्यांनीही सुमारे ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात निराळीच चर्चा रंगताना दिसत आहे.

Loading...

मतमोजणीच्या कलांनुसार भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युतीचा होणार याबद्दल दुमत नाही. पण प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सभेत भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे म्हटले होते.

सेनेचे संजय राऊत यांच्याकडून ५०-५० चा फॉम्युला सांगण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचा की शिवसेनेचा अशी चर्चा सुरू झाली आहे.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. “भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल”, असे ट्विट सावंत यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपाने या निवडणुकीत मित्रपक्षांसमवेत एकूण १६४ जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने १२४ जागांवर आपले नशीब आजमावले होते. भाजपाचे नेतेमंडळी स्वबळावर १४५ ची मॅजिक गाठण्याचा दावा करत होते.

पण त्या पद्धतीचे यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे कदाचित भाजपाला सेनेसोबत ५० – ५० फॉम्युला वाटून घ्यावा लागेल असे चित्र आहे. पण महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेला जर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा मिळाला, तर आदित्य ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतो, अशी चर्चा केली जात आहे.

Loading...

दरम्यान, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये युतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर युतीला किती जागा मिळणार, यात भाजपाच्या किती जागा असतील याची सर्वत्र उत्सुकता आहे.

१९८५ च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही एका पक्षाला १४५ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. १९९० मध्ये काँग्रेसला चार जागा कमी पडल्या होत्या. १९९५ पासून राज्यात युती किंवा आघाडीची सरकारे सत्तेत आली.

युतीला वातावरण अनुकूल असले तरी भाजपा किती जागांचा पल्ला गाठणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. भाजपाला १३० ते १३५ जागा मिळतील, असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. भाजपचे १४५चा जादुई आकडा गाठण्याचे स्वप्न यंदा साकार होण्याची शक्यता कमी दिसते.

शिवसेनेचे मावळत्या सभागृहात ६३ आमदार होते. शिवसेनेच्या जागा वाढतात की घटतात याबाबतही लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त वाढू नये, असाच भाजपचा प्रयत्न होता.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पानिपत होईल, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. गतवेळी काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. तेवढे यश मिळाले तरीही आघाडीसाठी समाधानकारक असेल.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.