महाराष्ट्रातील या गडावर गेल्यावर होतो कैलास पर्वतावर गेल्याचा भास !

0

‘इंद्रवज्र’ ऊन, सावली, ढग आणि प्रकाशाचा अद्भुत खेळ म्हणजे इंद्रवज्र! हरिशचंद्र गडाच्या कोकणकड्यावरून एका विशिष्ट काळात दिसणार, शक्यतो पावसाच्या आधी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात निसर्गाचा मेळ जमून येतो तो म्हणजे कड्यावरून वर येणार धुकं, आणि कड्याच्या विरुद्ध उगवणाऱ्या सूर्याची किरणे त्या ढगांमध्ये पडतात आणि आपण जर त्या मध्ये आलो तर ढगांमध्ये आपली दिसणारी सावली आणि तिच्याभोवती पूर्ण गोल दिसणार इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रवज्र!

बरेच गिर्यारोहक गडावर 7 दिवस राहतात पण वेळ काही जमून येत नाही, पण कालच्या महाशिवरात्रीच्या सकाळी ती वेळ एका दिवसासाठी जमून आली, अवघा उन्हाने घामजलेला कोकणकडा हळू हळू गार होऊ लागला, धुक्याचं साम्राज्य पसरलं, बघता बघता कडा कैलासा प्रमाणे भासू लागला, रातभरच धुकं त्यात रात्रीला मंदिरातले लुकलूकणारे दिवे, शिवनामाचा घोष, पांढऱ्या फुलांचा गंध सार कस साधनामस्त!

रात्र जागण्यात गेली आणि सकाळी धुक्याने तंबू दमट झालेला, कड्यावर सावळाने हाक मारली, धावत जाऊन पहातो तर तो दरीत सूर्याच्या किरणांचा आणि धुक्याचा खेळ सुरू झाला होता, आम्ही त्याच्या मध्ये उभे होतो, आणि समोर दारीतल्या त्या धुक्याच्या कॅनव्हास वर आमचं सिलहाऊट मधलं चित्र आणि त्या भोवती सप्तरंगी वर्तुळ, धन्य झालो देवा! वेड लागल्या सारखा नाचत होतो रे मी, तू इतका भव्य आहेस इंद्रवज्रा की तू माझ्यातलं लहान मुलं जाग केलंस रे!

Credit : हर्षद समर्थ 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!