इथे माणसाचा नव्हे तर माणुसकीचा अंत झालाय, वाचा सविस्तर !

0

माझा पुतण्या सुमित कवडे हा खुलताबाद वरून परत येत असताना दौलताबाद जवळील शेळके मामा हॉटेल जवळ समोरून भरधाव वेगाने येणारी गाडी TATA Harrier गाडी नंबर MH 20 FG 1008 जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले व गाडी चालकाने त्याला मदत करणे सोडून गाडी सोडून पळ काढला. थोड्याच वेळात तेथे 200 ते 250 लोकांचा जणसमुदाय जमा झाला व त्या लोकांनी फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतली एक पण व्यक्ती त्याला मदत करण्या साठी पुढे आला नाही.

सुमित सगळ्यांना मदती साठी हाक मारत होता विशेष म्हणजे त्यात काही महिला पण होत्या त्यांना पण तो ताई माझी मदत करा( मला कानं करा, आडवा करा) अशी विनवणी करत होता पण कोणी त्याच्या मदतीला आले नाही त्याला तडपू दिले व त्याचा विडिओ बनवणे, फोटो काढणे याला महत्व दिले. हीच माणुसकी राहिली माणसानं मध्ये. जर त्याची कोणी मदत केली असती तर सुमित आज जिवंत असता.

सगळ्यांना माझी एक विनंती की असे करू नका अपघात झालेल्या व्यक्तींना मदत करा, मदत करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीची पोलीस माहिती ठेवत नाही व त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास देत नाही. प्लीज हा massege जास्तीत जास्त share करा जेणे करून जे आमच्या सुमित सोबत झाले ते कोनाही सोबत होणार नाही व भरधाव वेगात गाडी चालवून सुमितला उडवणारया गाडी चालकाला शिक्षा मिळेल आणि सुमितला न्याय मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!