कृषीप्रधान देशातल्या गद्दारांनो अजून किती शेतकऱ्यांचे मुडदे पहायचे आहेत तुम्हाला ???

0

कृषीप्रधान देशातल्या गद्दारांनो तुमच्या अंगातल्या कडक स्टार्च केलेल्या शुभ्र खादीवर न दिसणारे असंख्य डाग आहेत त्याच कापसाच्या शेतात आत्म हत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताचे .., वाईट वाटतंय की साहेब थुकले तरी किती छान थुकतात म्हणून झेलत बसणारे तमाम बगलबच्चे, लाचारी पत्करून झालेले निष्ठावंत, कट्टर कार्यकर्ते, जाऊ द्या ना आपल्या काय करायचंय म्हणून साडी-माडी-गाडी करत मजा मारत वावरणारी थोर भोंदू, गांडू-जमात,

कायम पब-हब च्या धुंदीत असणारे उच्चभ्रू, मेंदू नसल्यागत बापाच्याच मारेकऱ्यांचे झेंडे घेऊन फिरणाऱ्या शेतकऱ्यांच्या काही अवलादी,
मंदिर-मस्जिद वर भांडत बसलेल्या अगणित रिकामचोटांनो .. व्यवस्थेने केलेल्या या लाखो हत्येचा जाब कधी व्यवस्थेला विचारणार आहेत की नाही ??

की हे असंच चालणार वर्षानुवर्षे .., गोर-गरिबांच्या मृतदेहाचे लचके तोडून माजलेल्या गिधाडांना, कष्टकऱ्यांचे रक्त पिऊन फुगलेल्या रक्तपिपासू गोचिडांना ठेचनार आहात की नाही तुम्ही ?? की त्यांचीच हुजरेगिरी करत हे असंच चालू ठेवणार कांद्याच्या ढिगांऱ्याप्रमाणे मृतदेहाचे ढिगारे पडेपर्यंत …., कधी तरी जेवतानाचा घास नाकाजवळ घेऊन बघा,, तुम्ही खाता त्या प्रत्येक घासाला राबणाऱ्या-मरणाऱ्याच्या घामाचा मातीचा गंध येईल !!

तुमचं हिमोग्लोबिन कमी होऊ नये म्हणून कित्येकांनी त्यांचं रक्त सांडलेलं असतं …, हयात नसलेल्यांचे पुतळे बांधायचे अन जित्या-जागत्यांचे मुडदे पाडायचे,, हे कोणत्याच महापुरुषाला पटलं नसतं .., कधी विचार केलाय का कापसाच्या अन त्याच कापसाच्या कपड्यांच्या किंमतीत जमीन अस्मानाचा फरक आढळतो ते,  आमचं सोयाबीन तीन हजारात १०० किलो घेता तुम्ही पण तुमचं बियाणं- मात्र ८०० रुपयाला १ किलो विकता ??

आमचा माल कच्च्याचा पक्का करून किती दिवस तुमच्या तुंबड्या भरणार तुम्ही ?? तुमच्या मालाचा किंमती अव्वाच्या-सव्वा तुम्ही स्वतःच ठरवता पण आमच्या सोयाबीन कांद्याचा भाव सरकार ठरवतं. आमचं दूध 20 रुपयाने अन तुमची आईस-क्रीम 400 रुपयाने !!
साधं पाणी सुद्धा 20 रुपयाने विकतय,, त्यावर अशी कोणती प्रक्रिया करता तुम्ही ?? मुळात आम्हाला शिकवलंच चुकीचं जातंय की
”दाणे दाणे पे लिखा है खाणे वाले का नाम”  लेकिन  असल में तो ‘दाणे-दाणे पे लिखा होता है उसके लिय मरणेवाले का नाम !!

लेखक  – चांगदेव गिते

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!