या कारणामुळे अभिनेत्री काजोलने केले होते अजय देवगणशी लग्न, कारण ऐकून तुम्हालाही गर्व वाटेल!

हिंदी चित्रपटसृष्टीचं एक साम्य बऱ्यापैकी आढळुन येतं. एकच हिरो हिरोईन अनेक चित्रपटामध्ये असतील तर एक दिवस त्यांच्यामध्ये प्रेम झाल्याशिवाय राहत नाही. एक अशीच जोडी आहे, जिनं एका चित्रपटात सोबत काम केलं. आणि पुढं नेमकं काय झालं ? प्रेम, लग्न की ब्रेकअप !..आज आपण तीच माहिती जाणुन घेणार आहोत. अजय देवगण आणि काजोल या दोन्हींचं नाव सगळयांना माहीत आहे. दोघांनीही अनेक हिट्स चित्रपट दिलेले आहेत. नव्वदच्या दशकात सुरू झालेला चित्रपट प्रवास आज दोघांचाही यशस्वी टप्प्यावर आहे. त्यांच्या संसाराचा प्रवास ही आज खुप सुखकर चालु आहे. आपल्या मुलांबरोबर ते सध्या मुंबईत राहत आहेत. पण त्यांची प्रेम स्टोरी खुप वेगळी आहे.

1997 ते 99 मधील गोष्ट. दोघे ही करियरच्या चांगल्या टप्प्यावर होते. अजय देवगण ने अनेक चित्रपट केले होते. काजोल ला इंडस्ट्री मध्ये येऊन सात ते आठ वर्षं झाले होते. एका मुलाखती नुसार काजोल चं म्हणणं आहे की ” माझ्याकडे त्याकाळी नाव आणि पैसे दोन्हीही होता पण मनातलं सांगायला, हक्काचं कुणी नव्हतं. त्यामुळे तिला खूप मानसिक त्रास व्हायचा. वर वरचं प्रेम करून दोन वर्षांनी लगेच विभक्त होण्यातली मी नव्हते.

याआधी मी आणि अजय देवगण ने सोबत बरेच चित्रपट केले होते. त्यामुळे थोडं का होईना आम्ही एकमेकांना ओळखत होतो. अजय हा खुप समजदार होता. शांत स्वभावाचा होता. मी त्याला माझ्या मनातलं सगळं काही सांगायचे. मग हळूहळू आम्ही एकमेकांना डेट करायला लागलो.

पुढं आमच्यात पक्की मैत्री झाली. काही काळानंतर आम्हाला हलचल हा सिनेमा मिळाला. इथे पून्हा एकदा दोघांनाही एकत्र काम करायची संधी मिळाली. त्या सिनेमात आमची मन जुळलं. विचार जुळले. प्रेम झालं आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण मला तरी अजय हाच आयुष्यभर साथ देणारा योग्य वाटला. त्यालाही मी आवडायचे. शेवटी आमचं प्रेम लग्नाच्या मार्गी एकमेकांना सुंदर आयुष्यात घेऊन गेलं.

काजोलला अजय कोणत्याच बंधनात ठेवत नाही. तिला जे स्वातंत्र्य हवं आहे ते तो देतो. म्हणूनच काजोल पुन्हा इंडस्ट्री मध्ये काम करायला तयार झाली. दिल वाले दुल्लन ले जायेंगे या चित्रपटात शाहरुख खान सोबतची तिची भूमिका खुप गाजली.

आजही मुंबईत एका सिनेमा गृहात तो चित्रपट चालतो. काजलचं कुटुंब हे इंडस्ट्री मधूनच येतं. तिची आई सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. काजल ची बहिण ही अभिनेत्री आहे. एवढंच नव्हे तर कोणतच काम तिच्यासाठी लहान मोठं नसतं. आजही ती स्वतःला जमिनीवरच पाहते. तिच्या या जीवनाला स्टार मराठी कडुन खुप शुभेच्छा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.