आकाश अंबानींच्या लग्नात या दिग्गज कलाकारांनी लावले नीता अंबानी सोबत ठुमके !

0

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरी लग्न सोहळा पार पाडल्या गेला आणि ते लग्न होता आकाश अंबानी आणि श्लोक मेहता हिचं. आकाश आणि श्लोका यांच्या लग्नात आलेले बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध कलाकार महत्त्वाचे पात्र ठरले. लग्नाचा हा कार्यक्रम 2019 मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे. शाहरुख खान, रणबीर कपूर आणि करण जौहर हे अंबानीच्या घरी सुरुवातीपासूनच होते आणि अंबानी-मेहता यांच्या विवाहात वऱ्हाडात त्यांनी आकाश सोबतच त्याच्या आई नीता अंबानी सोबत देखील जोरात ठुमके लावले.

मनीष मल्होत्राने डिजाईन केलेल्या पांढऱ्या शेरवानीत शाहरुख नाचताना नीता अंबानीला साथ देताना दिसला. डिसेम्बर २०१८ मध्ये लग्न झालेली आकाशची बहिण इशा देखील आमच्या भावाच्या लग्नात आपले वडील मुकेश अंबानीसोबत नाचताना दिसली. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या या लग्नात समस्त बॉलीवूडने हजेरी लावली.

रजनीकांत आपली मुलगी मुलगी सौंदर्या आणि जावई विशांग वानंगमुडी, अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता, अभिषेक बच्चन, पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याय, आमिर खान आणि त्यांची पत्नी किरण राव, प्रियांचा चोपडा आणि त्यांची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ, अभिनेत्री दिपिका पादुकोण आणि रणवीर सिंह, अभिनेत्री अलिआ भट्ट, करिश्मा कपूर आणि किरा अडवाणी यांच्यासह बरेच अभिनेते आणि अभिनेत्री तिथे उपस्थित होत्या.

बॉलीवुड बाजूला सोडला तर मुकेश अंबानींनी माजी संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव बान की मून, माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांची पत्नी चेरी ब्लेअर यांना आपल्या मुलाच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. रतन टाटा, लक्ष्मी निवास मित्तल आणि उषा मित्तल, आनंद महिंद्रा आणि गौतम सिंघानिया यांनी सुद्धा आपली हजेरी लावली. या तीन दिवसीय लग्नसमारंभाला शनिवारी सुरूवात झाली होती आणि ११ तारखेला नाविवाहित दाम्पत्य रिसेप्शन देणार आहेत. स्टार मराठी कार्यकर्त्यांकडून आकाश-श्लोका यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!