आकाश अंबानी व श्लोका मेहता यांच्या शाही विवाहाच्या शाही पत्रिकेची किंमत ऐकून व्हाल थक्क !

0

विवाह सोहळ्यास सुरवात झाली ,फाल्गुनी पाठकच्या दांडियाने. लग्न म्हटले ,की जय्यत तयारी, हौसमौज, पाहुण्यांची खातिरदारी हे सारं आलंच. गरीब असो, वा श्रीमंत ,जो तो आपापल्या परीने या निमित्ताने आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण सोहळा साजरा करायला पाहतोच . त्यात देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती च्या घराण्यातील लग्न  ? मग काय विचारता या शाही लग्नाची चर्चा झाली नाही, तरच नवल.

अगदी लग्नाच्या निमंत्रण पत्रिके पासून, ते जेवणातील मेन्यूपर्यंत व लग्नातील मेहंदी पासून ते संगीत समारोहा पर्यंत सगळं काही शाही व खासंखास. आता तुमच्या लक्षात आलंच असेल हा विवाहसोहळा आहे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानी याचा .मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा हा सुपुत्र, विवाहबद्ध होत आहे.

श्लोका मेहता या नववधूशी. या भाग्यवान वधू-वरांच्या विवाहाचे आमंत्रण ,म्हणजे तेही शाहीच असायला हवे…त्यामुळे हे आमंत्रण करणारी पत्रिकाही शाहीच आहे यात शंकाच नाही… या शाही विवाह पत्रिकेची रचना ,सजावट ,किंमत पाहता ,ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच्या विवाहाची आहे, हे सहज लक्षात येते. या शाही पत्रिकेची किंमत आहे… चक्क ‘एक लाख पन्नास हजार’.

या शाही पत्रिकेद्वारे निमंत्रण मिळवण्याचा मान लाभला आहे ,मुंबईतील सिद्धिविनायकाला. नुकतेच अंबानी कुटुंबियाने सिद्धिविनायका पुढे ही शुभशकुनाची पत्रिका ठेवून, निमंत्रणाचा शुभारंभ केला आहे .त्यामुळे आता आकाश अंबानी व श्लोका मेहेता यांच्या विवाह सोहळ्याला आता प्रारंभ झाला आहे .अंबानी कुटुंबीयांचे जगप्रसिद्ध निवासस्थान “अॅन्टिलिया ” मध्ये एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होत.

या प्रसंगी दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक च्या गाण्यावर दांडियाचे आयोजन केले होते. सर्व अंबानी कुटुंबीयांनी या दांडियात हौसेने सहभाग घेऊन ताल धरला होता. आता मात्र उत्सुकता आहे ,ती यापुढे होत रहाणार्या विवाहपुर्व शाही सोहळ्यांमधिल नव्या नव्या शाही गोष्ठींची.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!