एकेकाळी अभिनेत्री रवीना टंडनच्या प्रचंड प्रेमात वेडा होता सुपरस्टारअक्षय कुमार ! पण एकेदिवशी असं काही घडलं ज्यामुळे…

नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटात एक जोडी प्रचंड गाजली होती. त्यांचे अनेक चाहते साऱ्या भारतात झाले होते. त्यांनी अनेक चित्रपट सोबत केले होते. तेही प्रेक्षकांना खूप आवडले होते. दोघेही चित्रपट मार्केट मध्ये एक नंबरची जोडी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं प्रेम ही सगळ्यांना माहित होतं. अनेक काळ त्यांच्या प्रेमाची केमिस्ट्री फिजिक्स ला सोबत घेऊन चालली.

पण बायोलॉजीच्या मुद्द्यावर जरा घोळ झाला. आणि जोडी फुटली. मित्रानो, बायोलॉजी बाबतचा थोडा विनोदाचा भाग होता; पण खरं पाहिलं तर त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. अनेक सुपरहिट चित्रपट देऊन सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या यादीत ते अव्वल आले होते. म्हणजे योग सगळीकडून जुळून आले होते. सगळं आनंदात चाललेलं असतानाही त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं. तुम्हाला उत्सुकता लागली असेल की ही जोडी नेमकी कोणती होती ? तुम्हाला खिलाडीकुमार माहितेय ? तुम्हाला शूल, बारूद मधील टंडन माहितेय ?

होय, अक्षय कुमार आणि रविना टंडन या प्रसिद्ध जोडीबद्दलचं तुम्हाला माहिती सांगणार आहोत. की कश्यामुळे दोघांना नातं तोडावं लागलं.त्यांचं प्रेम हे लग्नापर्यंत येऊन पोहचलं होतं. मीडियात याबाबत त्यांनी खुलासा ही केला होता. पण नंतर कळलं की दोघांनीही गपचूप लग्न केलं आहे. तेव्हा त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता.

कारण आता अजून त्यांची पडद्यावर जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळेल. त्यातून मनोरंजन होईल. हा एकमेव प्रेक्षकांचा हेतु. पण पुढं जरा चुकीचं घडलं. असं म्हणतात की देवाने वरूनच आयुष्यभराच्या साथीच्या गाठी बांधलेल्या असतात. अक्षय आणि रविना यांचं एकमेकांवरचं प्रेम पाहता, ते दोघेही एकमेकांचे साथीदार होणार असेच सगळ्यांना वाटले होते.

पण कदाचित त्यांची गाठ वरून बांधायचा देवाचा विचार नव्हता. म्हणूनच की काय ते दोघे एकत्र जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यांनी गपचूप लग्न नाहीतर साखरपुडा केला होता. लग्न करणार होते. पण काही कारणास्तव त्यांना विभक्त व्हावं लागलं. हे जेव्हा त्यांच्या चाहत्यांना कळलं तेव्हा त्यांचाही खूप हिरमूड झाला.

१९९८ साली त्यांचं ब्रेकअप झालं. नातं कायमचं तुटलं. पण काम दोघांचही थांबलं नाही. कुणीही याचा परिणाम नात्यावर होऊ दिला नाही. खरं पाहिलं तर प्रश्न हा होता की आता दोघे सोबत जोडीने चित्रपट करणार का ? तर हो. त्यांनी विभक्त झाल्यानंतर सुद्धा सोबत बरेच चित्रपट केले. बारूद, किमंत हे त्यातलेच एक.

एका इंटरव्यूह मध्ये अक्षय कुमारला ब्रेकअपचं कारण विचारलं होतं. तेव्हा अक्षयने उत्तर दिलं होतं की, आम्ही फक्त एंगेजमेंट केली होती. लग्न केलं नव्हतं. त्यांनंतर ही आमच्या काही वाद नाही आहेत. आजही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांना समजून घेतल्यामुळे आज आम्ही आपापल्यापरीने जीवनात सुखी आहोत.

एवढंच नाही तर आम्ही सोबत काही चित्रपट केले आहेत. तरीही तिथे आमचं काहीही बिघडलं नाही. उलट तुमच्या माहिती करीता सांगतो की, रविना टंडन या त्यांच्या करियर च्या बाबत खूप प्रोफेशनल आहेत. ते त्यांचं वैयक्तिकरित्या चाललेलं आयुष्य कधीही क्षेत्रात मिसळत नाहीत.

त्या दोघांनी खिलाडीयो का खिलाडी, मोहरा, बारूद, कींमत असे अनेक सुपरहिट चित्रपट सोबत केलेले आहेत.
प्रेमात जर समज असेल तर ते प्रेम कधीही मरत नाही.