शहिदांसाठी अक्षय कुमारने दीड दिवसात जमा केले 7 कोटी!

0

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 39 जवान शहीद झाले आहे. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरच्या अनेक परिसरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामान्य जनता ,खेळाडुनपासून ते बॉलीवुड फिल्मस्टार्स पर्यन्त या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. त्याच बरोबर अनेक लोकांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

गौतम गंभीर,  विरेन्द्र सहवाग, अमिताभ बच्चन, सलमान खान , मुकेश अंबानी तर आता अक्षय कुमार. अक्षय कुमारने तब्बल सात कोटी रुपये मदतनिधी जमा केल्याचं सांगण्यात येत आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी पप्रत्येकी  लाखाची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

त्यासोबतच क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच सलमान खानने देखील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यातील जवानांना आर्थिक मदत केली.

तर आता अभिनेता अक्षयकुमारने देखील आपली सामाजिक जबाबदारी राखत मोठं पाऊल उचललं आहे. 

अक्षयने सर्व जनतेला आवाहन करून भारत के वीर. या अ‍ॅपच्या माध्यमातून मदतनिधी गोळा केला आहे. विशेष म्हणजे अक्षयने खूप कमी कळवधीत म्हणजे दिड दिवसात सात कोटी रुपयांचा आर्थिक मदतनिधी जमा केला असून त्याने स्वत: या निधीमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. अक्षयने २०१७ मध्ये भारत के वीर. या अॅपची सुरुवात केली.

या अॅपच्या माध्यमातून तो शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत करत असतो. यावेळी देखील त्याने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अ‍ॅप आणि वेबसाईटची मदत घेण्याचे आवाहन केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!