Loading...

हा आहे भारतातील रहस्यमयी तलाव, कारण ऐकल्यावर तुम्ही देखील थक्क व्हाल!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

हे आहे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान. अनेक छोट्या छोट्या तरंगत्या बेटांनी मिळून बनलेले हे भारतातील ठिकाण खूपच आगळेवेगळे आहे. एका तलावामध्ये तरंगणाऱ्या बेटांवर काही लोक छोट्या झोपड्या बांधून राहतात. तसेच तलावात मासेमारी करून आपली उपजीविका चालवितात. जैवविविधतने समृद्ध असणारी ही जागा म्हणजे जणू नानाविध पशुपक्ष्यांचे नंदनवनच आहे.

भारताच्या मणिपूर राज्यातील लोकटक तलाव अनेक लोकांची तहान भागविण्यास मदत करतो तसेच मासेमारीद्वारे रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतो. वीजनिर्मिती तसेच शेतीसाठी सुद्धा ह्या तलावाचे पाणी वापरले जाते.

Loading...

ह्या तलावाची एक खासीयत आहे. ती म्हणजे पाण्यावर तरंगणारी बेटे. स्थानिक भाषेमध्ये त्यांना फुमडी असे बोलतात. माती, गाळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या झाडांनी मिळून ही तरंगती बेटे बनलेली असतात. एक सेंटीमीटर पासून ते २ मीटर पर्यंत बेटांचा भाग पाण्यावर असतो आणि उर्वरित भाग बुडालेला असतो.

उन्हाळ्यामध्ये जेव्हा तलावाचे पाणी कमी होते तेव्हा ह्या बेटांचा तळभाग जो झाडांच्या मुळांपासून बनलेला असतो तो तलावाच्या तळभागाला टेकला जातो. झाडांची मुळे पोषक द्रव्ये शोषून घेतात. पुढे पाणी वाढल्यावर ती बेटे पुन्हा तरंगू लागतात.

हजारो वर्षांपासून लोकटक तलावामध्ये अशी कित्येक तरंगती बेटे निर्माण झाली आहेत. ह्या फुमडिंची संख्या जास्त असणाऱ्या तलावाच्या भागाला सरकारने ‘कीबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केले.

ह्या ठिकाणी ८३ हुन जास्त झाडांच्या जाती, दुर्मिळ सांगई हरीण, भुंकणारे हरीण, पाणमांजर, रानटी मांजर, कोल्हा, इ. प्राणी, सापांच्या विविध जाती तसेच हंगामी पक्ष्यांची कायम रेलचेल असते.

Loading...

काही वर्षांपूर्वी तलावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नदीवर बांध घातल्यामुळे ह्या उद्यानाला पुराचा सामना करावा लागत असे. सततच्या पुरांमुळे बेटावरील झाडांची मुळे तलावाच्या तळभागाला चिकटण्याची प्रक्रिया खंडित होऊ लागली आणि धोका निर्माण झाला. तरी स्थानिक सरकारने ह्यावर वेळीच उपाययोजना केली. त्यामुळे उद्यानाची समृद्धता टिकवून ठेवण्यास मदत झाली.

लेखक : महेंद्र राऊत

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

 

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.