तुम्हाला माहिती आहे का अमित ठाकरे आणि मितालीची खरी प्रेम कहाणी !

0

‘इन्स्टंट’ च्या जमान्यात हल्ली नाती पण इन्स्टंट झाली आहेत. अशा युगात नुकताच एक प्रेमविवाह पार पडला तेही १० वर्षे त्याच नात्यात राहून.! अगदी परिकथाच जणू. म न से प्रमुख राज ठाकरे ह्यांच्या घरी त्यांचे पुत्र अमित ठाकरे ह्यांचं विवाहसोहळा दणक्यात पार पडला. नातेवाईक, राजकारण, सिनेसृष्टी आणि इतरही मित्रमंडळी ह्या लग्नाला आवर्जून उपस्थित होती. हे ‘स्टार स्टडेड वेडिंग’ नुकतेच मुंबईत पार पडले. वर आणि वधू ह्यांना भरभरून आशीर्वाद ही मिळाले. १० वर्षांच्या रिलेशनशिप नंतर अमित आणि मिताली हे लग्नाच्या बंधनात अडकल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता हे वेगळे सांगायला नको.चला तर मग , आज जाणून घेऊयात या दोन प्रेम पाखरांची ‘फेअरी टेल’ वाटावी अशी प्रेमकथा..

मिताली आणि अमित ची भेट कॉलेजपासूनची. दोघांचेही शिक्षण मुंबई मध्ये पार पडले. अमित पोद्दार कॉलेज चा विद्यार्थी ते मिताली रुईया कॉलेजची विद्यार्थिनी. पण कॉलेज वेगवेगळे असले तरी सामायिक मित्रमंडळींमळे ह्या दोघांची भेट झाली. कला शाखेत शिकणारी मिताली आणि कॉमर्स मधील अमित ह्यांची मैत्री हळूहळू चांगलीच घट्ट झाली. आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. अर्थातच राजकुमाराने राजकन्येला लग्नाची मागणी घातली आणि ह्या राजकन्येने लगेच होकारही दिला.. अमितची बहीण उर्वशी आणि मिताली ह्या दोघीही चांगल्या मैत्रिणी असल्यामुळे तिचे कृष्णकुंज वर येणेजाणेही होतेच. बघता बघता अमित मितालीच्या नात्याला १० वर्ष झाली आणि त्यांच्यातली मैत्री आणि प्रेम आणखीनच घट्ट झाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांचं मुलगा अमित आणि प्रख्यात डॉक्टर संजय बोरुडे ह्यांची कन्या मिताली ह्यांच्या दोन्ही कुटुंबाकडून ह्या दोघांच्या नात्याला कधीच मान्यता मिळाली. पण २०१७ मध्ये अमितला एक विशिष्ट जीवघेण्या आजाराने ग्रासले. त्यामुळे लग्न बाजूला ठेऊन मितालीने अमितच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे ठरवले. वाईट समयी तिने ठाकरे कुटुंबियांनाही मानसिक आधार दिला. अमितची खूप काळजी घेतली. अमित त्या आजारातून सुखरूप बाहेर पडल्यावर लगेचच त्या दोघांचा साखरपुडा पार पडला.

आताच दोघे लग्नाच्या बांधनातही अडकले असून त्या दोघांच्या नव्या नात्याला सुरुवातही झाली आहे. राजकारणातील सासर असले तरी मिताली ने स्वतःच्या फॅशन डिझायनिंग च्या शिक्षणावर स्वतःचा व्यवसायच करण्याचे ठरवले होते. आणि ह्याला ठाकरे कुटुंबीयांचा पाठिंबा ही लाभला. आपली नणंद उर्वशी बरोबर मितालीने स्वतःचे फॅशन बुटीक सुरू केलेले आहे. अशी उत्तम आणि कर्तृत्ववान सुनबाई ठाकरे कुटुंबियांना मिळाल्याने सगळेच आनंदात आहेत. तर मंडळी अशी होती अमित आणि मितालीच्या प्रेमाची गोष्ट. ज्याला कोणाची दृष्ट न लागो..!!

तुम्हाला कशी वाटली ही फेअरी टेल आम्हालाही कळवा…!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!