आनंद पंडित निर्मित सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्ममध्ये दिसणार अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी…

0

फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आनंद पंडित आणि अमिताभ बच्चन यांची जोडी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आनंद पंडित आणि अमिताभ बच्चन यांनी बऱ्याच महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. रूमी जाफरी दिग्दर्शीत सायकॉलॉजीकल थ्रीलर चित्रपटासाठी जेव्हा अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले त्यावेळी अमिताभ यांनी निर्माता म्हणून आनंद पंडित यांची मागणी केली. आनंद पंडित हे दिग्गज आणि आत्मविश्वासू निर्मात्यांपैकी एक आहेत आणि मुळात ते अमिताभ बच्चन यांच्या जवळचे मित्रही आहेत.

गेल्या दोन दशकांपासून अमिताभ बच्चन आणि मी एकमेकांना ओळखतो आणि आम्ही अगदी जवळचे मित्र आहोत असे आनंद पंडित म्हणतात. अमिताभ हे प्रतिभावंत कलाकार असून ते त्यांच्या कौशल्यासाठी आणि प्रतिबद्धेसाठी या क्षेत्रात ओळखले जातात. अभिनयामध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही हे तर आपल्याला माहितच आहे. केवळ एक मित्र म्हणून नाही तर एक अभिनेता म्हणून मी त्यांचा सम्मान करतो.

आनंद पंडित निर्मित सायकॉलॉजीकल थ्रीलर चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत इमरान हाशमी सुध्दा दिसणार आहे. जानेवारीत रिलिज झालेल्या वाय चीट इंडिया नंतर इमरान आता या चित्रपटात दिसणार आहे. आपल्या अभिनयाने लोकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्यांमध्ये इमरान हाशमीच नाव घेतलं जातं. अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे मी खुपच उत्साही असल्याचे आनंद पंडित पुढे म्हणतात. मला विश्वास आहे की या चित्रपटामधूनही तो एक वेगळीच प्रतिमा लोकांसमोर उभी करण्यात य़शस्वी होईल. आनंद पंडित यांनी आजपर्यंत बरेच चित्रपट केले आहेत. प्यार का पंचनामा २, सत्यमेव जयते, सरकार ३ असे चित्रपट त्यांच्या नावे आहेत. तर बाझार, टोटलधमाल, यासारख्या चित्रपटातून त्यांनी लोकांना खुप हसवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!