कोरोनावर मात करण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी केली इतक्या रुपयांची मदत…

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना जायबंदी करण्यासाठी सर्वच देश प्रयत्नशील आहेत. भारतातही केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारेही खांद्याला खांदा लावून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. भारतात कोरोना हा सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. पण ज्या पद्धतीनं तो पसरतोय, त्यामुळे तो केव्हाही तिसऱ्या टप्प्यात पोहोचू शकतो. कोरोनावर मात करण्यासाठी आता अनेक प्रतिष्ठित व्यक्ती पुढे सरसावले आहेत.

उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी व्हेंटिलेटर्स तयार करण्यापासून, महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्टही उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच स्वतःच्या पगारातील 100 टक्के वेतनही आनंद महिंद्रा कोरोनाग्रस्तांना देणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीही आनंद महिंद्रांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. कोरोना विषाणूची महामारी जगभरात प्रचंड मंदी मागे सोडून जाणार आहे. या जागतिक मंदीमुळे असंख्य छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे तरुण तसेच अनेक उद्योजक व रोजीरोटी कमावणारे काही लाख मजूर यांना सर्वाधिक नुकसान होणार आहे, असे महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी शुक्रवारी म्हटले होते.

कोरोना विषाणूच्या साथीवर आपल्याला विजय नक्कीच मिळेल; पण हे संकेट संपेल तेव्हा जगभरात प्रचंड आर्थिक मंदी आलेली असेल आणि त्याची फार मोठी किंमत सर्वांनाच चुकवावी लागणार आहे. या मंदीमुळे सर्वात जास्त नुकसान व्यावसायिक, स्वयंरोजगार असणारे उद्योजक व रोजंदारी कामगारांचे होईल, असे भाकीतही आनंद महिंद्र यांनी वर्तवले. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली होती.