ब्रेकअप नंतर ही अंकिता लोखंडे सुशांतसिंह राजपूत वर करत होती प्रेम ! का ? पहिलं प्रेम विसरणं आहे अवघड…

पहिलं प्रेम म्हणजे कधीही न मरणाऱ्या आठवणींचं अडगळीतलं एक घर. ज्या घरातुन नेहमी आठवणी पाझरत असतात. सकाळी काय खाल्लं, याचा संध्याकाळी विसर पडु शकतो; पण प्रेमाच्या काळात अनुभवलेल्या गोष्टींना कधीही विसर पडत नाहीत. जगण्यात येणारा विसरभोळापणा जर प्रेमात आला असता तर किती बरं झालं असतं.

आपण प्रेमाची व्याख्याच बदलून टाकलीय. एका मुलाचं-मुलीवर असलेलं प्रेम म्हणजे फक्त प्रेम नव्हे. तर या जगात प्रेम अखंड पसरलेलं आहे. ते वेगवेगळ्या नात्यांतून वाट काढत जिवंत राहत असतं. नात्याच्या गोत्याला कटुता येऊन निर्माण होऊ शकते खंत. पण याबाबतीत प्रेम खुप पुढं आहे. प्रेमाला अंत नाही.

सुशांतसिंह राजपूत या हरहुन्नरी सुपरस्टार अभिनेत्याला निरोप देऊन महिना उलटून गेलाय. तरीही त्याच्या परी असलेलं प्रेम मात्र अनेकांचं कमी होताना दिसत नाही. याचाच अर्थ विसरण्याचा प्रयत्न जरी करून पाहिला तरी सुशांत मनातून उतरत नाही. काल २४ जुलै हा दिवस तर सुशांत च्या चाहत्यांसाठी खूप महत्वाचा होता. कारण त्याचा शेवटचा चित्रपट “ दिल बेचारा ” रिलीज झाला.

त्या चित्रपटाने ओटीटी वरचे सगळे रेकॉर्ड्स एकाच दिवशी मोडून काढले आहेत.  त्याच्या जाण्याने साऱ्या देशावर दुखांचा मोठा डोंगर कोसळला आहे; पण त्यात एक मुलगी अशी आहे की ती सुशांत चं पहिलंवाहिलं प्रेम होतं. एक महिन्यानंतर सुद्धा तिला सुशांत या जगात नाहीये याचा विश्वास बसत नाही. तिचं नाव आहे अंकिता लोखंडे. अंकिता – सुशांत ‘ पवित्र रिश्ता ’ या टीव्ही सिरीयल मुळे एकत्र आली. त्यांची मानव अंकिताची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. दोघेही घराघरात पोहचले. दरम्यानच्या काळात मालिकेसारखं खऱ्या आयुष्यावर ही प्रेम बसलं.

ते त्यांनी खुलेपणाने स्वीकारलं सुद्धा. पण सुशांत ला मोठ्या पडद्यावर काम करायचं असल्याने त्याने सिरीयल सोडली. त्यानंतर त्याने काय पोचे हा पहिला चित्रपट करून आपलं नाव झळकवलं. पुढे २०१६ पर्यंत दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली. लग्न करायचं मिडियात जाहीर करून सुद्धा काही कारणामुळे त्यांचं ब्रेकअप झालं. पुढे दोघेही आपापल्या वाटेवर निघाली. सुशांत त्याच्या अभिनयाच्या जोरावर एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन सुपरस्टार झाला. तरीही दोघे एकमेकांना कधीच विसरू शकले नाही.

जेव्हा सुशांत ने आ-त्म-ह त्या केली असं कळलं तेव्हापासून अंकिताच्या डोळ्यांतुन अश्रू थांबत नाहीयेत. आता त्यांचं नातं का तुटलं ? हे मात्र अदृश पडद्याआडच आहे. असं ही म्हंटल जातं की कृती सेनोन आणि सुशांत मध्ये वाढत चाललेलं अंतर हे ब्रेकअपचं कारण असू शकतं. पण जरी शरीराने दोघे लांब गेले असले तरी मनाने दोघेही एकमेकांच्या खुप जवळ होते.

कारण तिने मागील महिनाभर स्वतःला घरात कोंडून घेतल्याचं वृत्त समोर येत होतं. नुकतेच तिनं तिच्या सोशल मिडीयावर दिवा जाळून आ-त्म्या-च्या शांती साठी प्रार्थना केली. सोबत तिने एक मोठी पोस्त ही लिहिली. त्यात तिने म्हंटलय की “ देवाच्या घरी गेलेल्या बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली. यावरून लक्षात येत असेल की त्यांचं एकमेकांवर किती अतुट असं प्रेम होतं. अश्याप्रकारे पहिलं प्रेम विसरनं आहे अवघड.