Loading...

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

शाळेची पायरी फक्त एकदाच चढलेला व्यक्ती काय करू शकतो ? तर याची शक्यता जर आपण लावली तर आपल्याला वाटेल की तो व्यक्ती दोन वेळेसचं जेवण आणि साधं जगणं अनुभवील . त्याच्या साठी या जगात घेतलेला जन्मचं सार्थक ठरेल. नशीबाला धरून चालण्याचा तो प्रयन्त करेल. नवसाच्या हौशेवर आयुष्य ढकलायचा प्रयत्न करत राहील. पण मग या प्रवाहाच्या विरुद्ध कुणीतरी हजारात एखादाचं स्वतःची होडी घेऊन जातो. होडीसोबत किनाऱ्याला जाऊन मिळतो. आणि तो या जगाला काहीतरी महत्वाचं देणं ठरतो. जो शिकतो तोच या जगात काहीतरी करू शकतो अशी सामन्यांची सामान्य व्याख्या मानली जाते. मग या सामान्य मानल्या जाणाऱ्या व्याख्येला कुणीतरी असामान्य करू शकतं की नाही ? तर करू शकतं. न शिकलेला व्यक्ती सुद्धा शिकेलेल्या व्यक्तीला शिकवण देऊ शकतो. जगण्याच्या या असमृध्द मानल्या जाणाऱ्या अडगळीला समृद्ध- दृढ करू शकतो.

” ये आझादी झुठी हैं ! देश की जनता भुखी हैं ! ” असं स्वातंत्र्यानंतर ही साऱ्या भारताला कळकळीने सांगणारे तुकाराम साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे हे सामान्य घरी जन्म घेऊन असामान्य बनून दाखवणारं व्यक्तिमत्त्व ! फक्त एकदा शाळेची पायरी चढलेला व्यक्ती सुद्धा शब्दांच्या अनेक पायऱ्या चढवून दाखवु शकतो. त्याच्यासोबत अनेक यशाच्या पायऱ्या सुद्धा चढवून देशाची खरी परिस्थिती समाजासमोर आणू शकतो. अण्णाभाऊ साठे हे त्याचं व्यक्तीचं नाव ज्यांनी अश्या अनेक पायऱ्या चढून सामाजिक समस्येवर मात केली आहे. १ ऑगस्ट १९२० मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात त्यांचा जन्म झाला.मांग समाजात जन्म घेऊन त्यांना लहानपणीचं देशातल्या जातीव्यवस्थेला तोंड द्यावा लागलं. पिढीजात चालत आलेल्या रूढी ,परंपरा आणि रीतिरिवाजा सोबतच लढावं लागलं.

Loading...

आपल्याच माणसांनी बनवलेल्या व्यवस्थेशी झुंजाव लागलं.  त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, हो पण केवळ दीड दिवस ते शाळेत गेले आणि नंतर तेथील सर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. पुन्हा आयुष्यात कधी शाळेचं नाव सुद्धा काढलं नाही. आणि तोंड सुद्धा पाहिलं नाही. पण बाहेरच्या जगातल्या शाळेत मात्र ते नित्यनियमाने जाऊ लागले. म्हणजे ते समाजात जाऊन समजाला ओळखू लागले.

या समाजाच्या शाळेनं मात्र त्यांना खूप शिकवलं आणि शिकता शिकता घडवलं सुद्धाही !  लोकांना ओळखून त्यांनी लोकांच्या कथा, कादंबरी लिहायला सुरुवात केली. पुढे सामाजिक चळवळीत सहभागी होऊन अनेक चांगल्या बदलला योगदान दिलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जर डोकावून पाहिलं तर त्यांनी दोन लग्न केली होती.त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे . त्यांना एकूण तीन अपत्ये होती – मधुकर, शांता आणि शकुंतला. पण सामाजिक चौकटीतून वंचित असणारे सारं आपलंच घर आहे अशी त्यांची समजूत होती.

लेखन करायला लागल्यापासून त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. १९५९ मध्ये त्यांनी लिहिलेल्या फकिरा या प्रसिद्ध कादंबरी ला राज्य शासनाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. कादंबरी आणि लघुकथा यांच्यासोबत त्यांनी रशियातील भ्रमंती ,नाटक आणि अनेक गाजलेले पोवाडे व गाणी त्यांनी लिहिली. साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले होते. व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीतुन ते खूप प्रभावित झाले. आणि त्यांनी बाबासाहेब यांच्या शिकवणीतून फकिरा ही कादंबरी लिहून समाजव्यवस्था दाखवणारा आरसा त्यांनी जगासमोर आणला.

Loading...

फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायकाला फकिराला चित्रित केले. त्यांनी अनेक पिढीजात चालत आलेल्या व्यवस्थेला लेखणीच्या विद्रोही पद्धतीतून लक्ष केलं. दलित कार्याला बद्दलवण्यासाठी त्यांनी त्यांच्या लेखणीचा वापर केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये ही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी समाजव्यवस्था ही समाजगरजेच्या मार्गावर आणण्यासाठी खूप काम केलं. त्यांच्या लेखणीच्या हत्याराने अनेक हत्यारे धारधार केली.

” ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूनं नि निष्ठेनं मी चित्रित करणार आहे नि करीत आहे ” …हे सांगणाऱ्या अण्णाभाऊंनी सामाजिक बांधिलकी पासून अलिप्त असणाऱ्याना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चौकटीत आणण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अश्या साहित्यसम्राट ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्या लढवय्याला पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन !

लेखक :- कृष्णा विलास वाळके

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.