एअर स्ट्राईक नन्तरही भारताची पाकिस्तानवर कारवाई चालूच.. आणखीन ५ पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या गेल्या..!!

0

स्वतःचे दहशतवादी वाचवण्यासाठी पाकिस्तानने भारतावर काश्मीरच्या शोपियान भागामध्ये कालपासून गोळीबार चालू केला आहे. पुलवामा हल्ल्याच्या बदल्यात भारताने काल पहाटे पाकिस्तानी दहशतवादी चौक्यांवर केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये १००० किलो चे बॉम्ब वापरले. ह्यामुळे दहशतवाद्यांच्या चौक्या, लाँच पॅड उध्वस्त झाले आणि अंदाजे २०० आतंकवादी मारले गेल्याची शक्यता आहे. ह्याच बरोबर जैश चा म्होरक्या मसूद च्या खानदानाचाही खात्मा झाल्याची बातमी आहे.

भारताच्या एअर स्ट्राईकला प्रति उत्तर म्हणून पाकिस्तानची काही ड्रोन आणि फायटर प्लेनस देखील काल भारताच्या दिशेने सोडण्यात आले होती मात्र भारताची युद्ध तयारी पाहून फायटर प्लेन तर माघारी फिरले आणि ड्रोन पाडण्यात आणि नष्ट करण्यात सेनेला यश मिळाले. हल्ल्याने गलितगात्र झालेल्या पाकिस्तानने मात्र आपल्या भ्याड आणि छुप्या कुरापती सोडल्या नाहीत.

त्यांनी जम्मू काश्मीर अशांत ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. सीमे पलीकडून गोळीबार सुरू आहे.. ह्या गोळीबाराचा समाचार घेताना भारताने पजिस्तानी आर्मी च्या ५ चौक्या उध्वस्त केल्याचे वृत्त आहे. ह्यामध्ये काही पाकिस्तानी सैनिकही ठार झाल्याचे सांगितले जात आहे.  तरीही पाकिस्तान जेरीस न येता अजूनही खोड्या वाढवताच आहे.

काश्मीरमध्ये अजूनही वातावरण धुमसत असलेतरी भारतीय सैनिकांच्या नियंत्रणात आहे. पाकिस्तानला आपले दहशतवादी सांभाळता येत नसल्यास भारत त्यांच्यावर आत घुसून कारवाई करेल आणि यमसदनी धाडले असा संदेश कालच भारताने दिल्यामुळे पाकिस्तान नक्की कोणाला वाचवायला प्रतिउत्तर देत आहे हे आज जगासमोर आता उघड झाले आहे..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!