Loading...

अंत्यसंस्कार करून आल्यावर अंघोळ का करतात?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाचा एक-ना-एक दिवस मरण अटळ आहे हे अंतिम सत्य आहे. कुणीही असो आणि कसाही असो त्याचं मरण हे अटळ आहे. एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं संपूर्ण विधीनुसार अंत्य संस्कार करण्यात येतं. एखाद्या व्यक्तीच्या प्रेतयात्रेत मृतकाच्या तिरडीला खांदा देणं पूण्य मानलं जातं खांदा देणं पूण्य मानलं जातं.

Loading...

हिंदू धर्मात स्मशानभूमीत अंत्य संस्कार करुन आलेल्या व्यक्तीच्या अंगावर गंगाजल शिंपडले जाते किंवा त्या व्यक्तीला आंघोळ करावी लागते. मात्र, आंघोळ करण्या यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहिती आहे का? नाही ना?

एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्याच्या प्रेतयात्रेत सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती आंघोळ करतो हे तुम्हाला माहिती असेलच. यापैकी काहीजण तर असे असतात की, ज्यांना आंघोळ का करतात हे माहितीही नसतं. तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? ज्यांना स्मशानातून आल्यावर आंघोळ का करतात हे माहिती नाहीये. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काय आहे नेमकं कारण. अंत्य संस्कार केल्यानंतर आंघोळ करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहे.

अंत्य संस्कार केल्यानंतर आंघोळ करण्यामागचं धार्मिक कारण

स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करण्यामागचं धार्मिक कारण असं आहे की, स्मशान एक अशी जागा आहे जेथे नकारात्मक शक्तींचा सहवास असतो. या शक्ती कमकुवत व्यक्तीवर लवकर कब्जा करतात. पुरुषांच्या अपेक्षा या महिलांपेक्षा अधिक भावूक आणि मानसिक रुपाने कमकुवत असतात आणि त्यामुळेच त्यांना स्मशानात जाण्यापासून रोकतात.

असे म्हटले जाते की, अंत्य यात्रा संपल्यानंतर आत्मा काही काळ तेथच उपस्थित असतो. जो कुणावरही प्रभाव टाकण्याची शक्ती ठेवतो.

अंत्य संस्कार केल्यानंतर आंघोळ करण्यामागचं वैज्ञानिक कारण

अंत्य संस्कारानंतर आंघोळ करण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. अंतिम संस्कार करण्यापूर्वी मृतदेह हा बराचकाळ बाहेर असतो त्यामुळे वातावरणात सुक्ष्म आणि संक्रामक किटाणूंचा संसर्ग वाढतो. तसेच मृत व्यक्तीचे शरीर संसर्गित रोगापासून ग्रासले जाते.

Loading...

त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. पण, आंघोळ केल्यानंतर किटाणू साफ होतात आणि म्हणून अंत्य संस्कार केल्यानंतर आंघोळ करण्याची प्रथा आहे.

माहिती सौजन्य: तुफान

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.