शेतकऱ्या विषयीचा अप्रतिम लेख “अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी”

0

भारत हा आपला एक विकसनशील देश झपाट्याने प्रगती करतोय.यामध्ये प्रामुख्याने बुलेट ट्रेन,स्मार्ट सिटी,मेट्रो सत्यात उतरवताना दिसतोय आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर वाढतोय तसेच ५ट्रिलियन सारख्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करतोय. या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे कृषी क्षेत्र.आपल्या मोठी अर्थव्यवस्थे सारख्या मोठ्या स्वप्नपूर्तीचा एक स्रोत, आणि या कृषी क्षेत्राचा आत्मा म्हणजे “शेतकरी”

हल्ली शेतकरी हा शब्द कानावर पडताच आत्महत्येचे चित्र डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.एकीकडे हाच शब्द जगाला पोसतोय दुसरीकडे स्वतः मात्र पोटाला चिमटा घेतोय,जगाला पोसणाऱ्या या पोशिंद्याकडे किमान त्याच्या जगण्याकडे का लक्ष्य दिले जाऊ नये?
शेतकऱ्यांच्या सय्यमांसाठी कोणीही हात धरू शकत नाही जो बियाणे पेरून पाऊसाची वाट बघण्याची जुगार खेळतो परंतु दुष्काळ त्याची पाठ सोडायला तयार नाही.

एक वर्षाचा पाऊस झाल्यानंतर तो ५-१० वर्षांनी भेट देतोय यामुळे तो हवालदिल होतोय,त्याच्या दृष्टीने स्वाभिमान असलेले शेत तो परिस्थितीमुळे विकतोय पण शेवटी तो हरतोय आणि आपला मार्ग निवडतोय.नाही मरत तो तुमच्या विम्यासाठी किंवा सवलतीसाठी.

सरकारने अनेक कृषी कामांना अनुदान देऊन खूप मोठे काम केले,परंतु यासाठी असते ती प्रारंभिक रक्कम खर्च करणे ,ज्याच्याकडे खायला काही नाही तो काय पैसे खर्च करणार. अन्य वर्गातून शेतकऱ्याच्या आत्महत्या दारूमुळे होतात असे बोलले जाते ,पण शेतकरी दारू पितो तो इतरांसारखे मौज मजा करण्यासाठी नाही तर पर्याय नाही म्हणून.

‌झाडे तोडन्यासारख्या चुका त्याच्या पण आहेत,परंतु ती चूक त्याला आता समजली आहे आता तो प्रयत्न करतोय, तडफडतोय.आता त्याला आधाराची गरज आहे,यामध्ये राजकारण ,प्रसिध्दी या गोष्टी बाजूला ठेवणे काळाची गरज आहे.सरकारने मोठ्या कमांपेक्ष्या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजांकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे ,त्याला हमीभाव देणे महत्वाचे आहे.

कारण यातुन बाहेर पाडण्यासाठी तो जमीन विकून शहरातील औद्योगिक क्षेत्रात अल्पश्या पगारात काम करतोय आणि शेतीतला ‘High skill’ असलेला माणूस तिथे ‘unskilled ‘म्हणून काम करतोय,आणि आपला एक एक शेतकरी कमी होतोय. मग सरकारला शेतकरी घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते ही आत्ताच्या शेतकऱ्यांप्रमाणे घडतील यात शंकाच!
– विशाल खांदवे

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!