‘आयुर्वेद’ भारताने आख्या जगाला दिलेल्या ह्या देणगीचे वय किती..?

0

भारताने जगाला खूप गोष्टी दिल्या आहेत. शून्या पासून आज पर्यंतच्या सगळ्या मोठमोठ्या असामी पर्यंत. भारताचे सगळ्या क्षेत्रात बऱ्यापैकी योगदान आहे. आयुर्वेद आणि योग ही तर जगाने मानलेली देणगी. योगाचा प्रचार प्रसार विदेशातही जोरात चालवू आहे. कित्येक परदेशी माणसे आपल्या सकाळची सुरुवात प्राणायाम आणि योगासनांनी करतात. तसेच ‘आयुर्वेद’ देखील जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.

ayurved-500x500

आयुर्वेद म्हणजे पृथ्वी मातेकडून मिळालेल्या गोष्टी ज्यांचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो. रोगांमध्ये औषध म्हणून असेल किंवा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणारे साधन म्हणून असेल पण आयुर्वेद नक्कीच जगमान्य झालेला आहे. हल्ली तर आयुर्वेदाचं मार्केटही खूप वाढलं आहे. पण हा आयुर्वेद म्हणजे आत्ता शे दोनशे वरहातला शोध नाही. मग ह्याचं वय नक्की आहे तरी किती..?

विदेशी इतिहासकार म्हणतात आयुर्वेद २ ते ५ हजार वर्षांचा असेल. तेव्हा पासून तो अस्तित्वात आला आणि लोकांनी आत्मसात केला. काही जण म्हणतात हा युर्वेद किमान दहा हजार वर्षे तरी जुना असावा. जो तो आपापल्या परीने आयुर्वेदाच्या वयाची गणिते मांडतो. पण खरंच जर आयुर्वेद फक्त पाच किंवा दहा हजार वर्षेच जुना असेल तर मग रामायणात त्याचा उपयोग केलेला कसा काय आढळतो.? म्हणजे हनुमानाला वैद्य सुशेन ने लक्ष्मणाच्या इलाजासाठी जी संजीवनी बुटी आणायला सांगितली तोही आयुर्वेदच नाही का.??

एवढंच नाही तर वैद्य सुशेनने जवळजवळ १२०० औषधी कंदमुळे हनुमानाने आणलेल्या त्या पर्वतावरून शोधून युद्धात जखमी सैनिकांना बरे केले होते. आणि ह्या गोष्टीला किमान ८० हजार वर्षे तर झालीत. मग हा आयुर्वेद फक्त पाच दहा हजार वर्षे जुना म्हणता येणारच नाही..!! रघुवंश पहिला तर त्याही आधी कित्येक वर्षे रघुवंच चालत आला आहे.. म्हणजे ८० वर्षांपेक्षा जास्ती..

ayurveda-dietitiantreatment

भारताची सुरुवात भगवान आदिनाथनपासून सुरू झाली आणि त्याही वेळी हे औषध ज्ञान आग्क्यानं होते असे म्हणतात. आणि ह्या तर हजारो नाही तर करोडो वर्षे झालीत म्हणजे तसे गणित पकडून आयुर्वेदालाही तितकीच वर्षे झालीत असे म्हणावे लागेल. म्हणजे भारताने जगाला दिलेली ही आयुर्वेदाची देणगी जवळपास करोडो वर्षांची आहे तर.!! इतक्या वर्षात सगळे काही बदलले, आयुर्वेदानेही प्रगती केली पण आपली पाळंमुळं चांगलीच रोवून ठेवली आहेत. इतक्या वर्षात ह्या ज्ञानाला कोणता धक्का पोहचू शकला नाही. आणि ह्याही पुढे करोडो वर्षे आयुर्वेद मनुष्यप्राण्याची साथ देत राहील..!!

 

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी शेयर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!