Loading...

बजरंगी भाई सिनेमातील मुन्नी कशी दिसतेय माहितेय ! चार वर्षात झालेल्या बदलाची गोष्ट !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

चार वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपट आला होता. ज्या सिनेमाने खूप बक्कळ कमाई केली होती. आणि त्या सिनेमातील हिरो सलमान खान म्हंटल्यावर हमखास सिनेमाने खूप कमाई केली असेल अस म्हणणं काही वावग ठरणार नाही. वेगळ्या धाटणीचा ,वेगळ्या विषयाचा सिनेमा आला होता. बजरंगी भाईजान हे त्या सिनेमाचं नाव. सलमान ,मोहमद जिशान आयुब ,करीना कपूर ह्या सगळयांच्या भूमिका होत्या. पण ह्यात एका लहान मुलीची गोंडस भूमिका करणारी मुन्नी मात्र कुणीच विसरू शकत नाही.

Loading...

हर्षाली मल्होत्रा हे त्या बाल कलाकाराचं नाव. जसं वय वाढतं तसं आयुष्य ही वाढतं. आवडी निवडी बदलतात. राहणीमान बदलत जातं. गरीब असो वा श्रीमंत सगळेच बदलाला सामोरे जात असतात. बजरंगी भाई सिनेमात उत्कृष्ट काम करणारी बाल अभिनेत्री मुन्नी ही सध्या खूप बदललीय. तिचा वेगळाच लुक झाला आहे. तिनं तिचं राहणीमानात पूर्ण बदल केला आहे. तिच्या नवीन लुक चे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

मुन्नीचा भाबडेपणा आणि हात उंचावून आपलं बोलणं सांगण्याच्या पद्धतीच्या सारेच प्रेमात पडले होते. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ताबडतोब कमाई केली होती. या सिनेमात फक्त सलमानच नाही तर मुन्नीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राचंही भरभरून कौतुक झालं होतं.

Loading...

या सिनेमात मुन्नीचा भाबडेपणा आणि हात उंचावून आपलं बोलणं सांगण्याच्या पद्धतीच्या सारेच प्रेमात पडले होते. बजरंगी भाईजान’ची मुन्नी आता 11 वर्षांची झाली आहे. या चार वर्षांत तिच्या लुकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी ती सात वर्षांची होती. आता मुन्नी फार स्टायलिशही झाली आहे. शिवाय सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे.बजरंगी भाईजान’ सिनेमाआधी हर्षालीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षाली लवकरच ‘नास्तिक’ सिनेमात दिसू शकते.

बजरंगी भाईजान’नंतर ‘नास्तिक’ हा हर्षालीचा दुसरा सिनेमा असेल. कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात सलमान आणि हर्षाली व्यतिरिक्त करिना कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. आज हर्षाली म्हणेजच मुन्नी जरी अकरा वर्षांची असली तरी येणाऱ्या काळात बॉलिवूड ला एक हरहुन्नरी काम आत्मसात करून काम करणारी अभिनेत्री मिळणार हे मात्र नक्की !

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.