Loading...

संतुलित आणि असंतुलित आहार म्हणजे नेमकं काय?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

“नीट जेवण कर” वडिलधाऱ्यांकडून ऐकायला मिळणार नेहमीच वाक्य पण नीट जेव म्हणजे नक्की खायचं काय? तर संतुलित आहार. आपण नेहमी ह्याबद्दल ऐकतो, वाचतो. काही लोकांमध्ये ह्याबद्दल बरेच गैरसमज आहेत म्हणजे तेलकट-तुपकट पदार्थ खायचे नाही. मीठ, कांदा-लसूण पूर्णपणे टाळायचं वगैरे. असाच एक गोड गैरसमज ‘संतुलित आहार’ म्हणजे खूप कमी खायचं. खरंतर ह्यामुळे आहार संतुलित राहतच नाही पण शरीराला मात्र त्रास होतो.

संतुलित आहार म्हणजे काय?

आपल्या शरीराला योग्य पोषक-तत्व योग्य प्रमाणातच लागतात. त्यांची कमतरता किंवा अतिप्रमाणात सेवन निरनिराळ्या समस्यांना आमंत्रण देते. संतुलित आहार म्हणजे असा आहार जो आपल्या शरीराला लागणारे पोषक-तत्व योग्य प्रमाणात देईल. ह्यात मुख्यतः कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, फॅट, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ह्यांचा समावेश होतो.

Loading...

काय आहेत मिनरल्स?

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स (खनिजे) हे इतर सर्वांपेक्षा अगदीच थोड्या प्रमाणात लागतात त्यामुळे बरेच लोक ह्यांकडे दुर्लक्ष करतात. पण ह्यांची कमतरता हृदयरोग, रक्ताची कमतरता, थायरॉईड ह्यांसारख्या समस्यांचे कारण बनू शकतात.

आवश्यक खनिजे आणि त्यांचे कार्य

खनिजे स्रोत कार्य करमतरतेमुळे होणारे रोग
कॅल्शिअम दूध, सोयाबीन, बदाम, पालक दातांची व हाडांची मजबुती दंतरोग,

ऑस्टियोपोरोसिस

सोडिअम मीठ, मांस, चीझ, बीट, पालक,केळी, बटाटा पाचकरसांची निर्मिती निद्रानाश, बहिरेपणा, अपचन,मुळव्याध
लोह पालेभाज्या, बटाटा,मशरूम, टोमॅटो, किवी,डार्क चॉकलेट हिमोग्लोबिनची निर्मिती रक्ताची कमतरता, अशक्तपणा
आयोडिन मीठ, केळी, शतावरी, शिंघाडा, स्ट्रॉबेरी शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थांपासून मेंदूला वाचवते थायरॉईड, डिप्रेशन
क्लोरीन टोमॅटो, पाणी, ऑलिव्ह सोडिअम- पोटॅशियमला पाचक बनवण्यासाठी मदत करते ऍसिडिटी, अल्सर
Loading...

कसे मिळवाल खनिजे?

  • दूध हे खनिजांचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे दुधाचे नियमित सेवन खनिजे मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु काळजी घ्यावी की दूध जास्त प्रमाणात उकळू नये अन्यथा त्यातील खनिजे नष्ट होतात.
  • आहारात फळ-भाज्यांचे प्रमाण जास्त असावे.
  • काही फळांच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे असतात अशी फळे सालींसोबत खावी.
  • फळं, डाळी किंवा भाज्या नेहमी चिरण्यापूर्वी किंवा उकडण्यापूर्वीच धुवून घ्याव्यात नाहीतर पाण्यावाटे त्यातील खनिजेही बाहेर फेकली जातात.

लेखिका: भक्ती तायडे

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.