नववी पास दिव्यांग व्यक्तीने केली कमाल.. आता शेतीतून कमावतो वर्षाकाठी १५ लाख रुपये..

1

ह्या युगात दिव्यांग असणे म्हणजे बऱ्याचश्या संधींना मुकणे..!! कारण अशा दिव्यांग व्यक्ती कधीच ‘मेन स्ट्रीम’ मध्ये गृहीत धरल्या जात नाहीत. त्यांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार काम करून आपल्या पोटाची खळगी भरावी लागते. मात्र ‘बाळासाहेब पाटील’ ह्या मुलाच्या मनात दुसरेच काहीतरी होते. शिक्षण फक्त नववी पास आणि पैसे कमवायचे साधन म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणे.

त्यातून शरीराला असलेले व्यंग सुद्धा मोठ्या भराऱ्या मारण्यापासून मागे खेचत होते. अशा परिस्थितीत बाळासाहेब कच खाल्ली नाही. चार वर्षांत त्याने सगळी कर्जे फेडून तो स्वतः करोडपतीही झाला.. कशी केली ही कमाल..? सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात गाजत असलेल्या पण दुष्काळी सोलापुरातल्या माढामधील उपळई गावचा बाळासाहेब पाटील हा दिव्यांग शेतकरी.

घरची परिस्थिती बरी नसल्यामुळे भावाबरोबर दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करण्यापलीकडे काही दुसरे काम नाही. शिक्षण फक्त नववीपर्यंत असल्याने दुसरी कोणती नोकरी मिळणेही दुरापास्तच.. घरची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की एक वेळच जेवणे त्यांच्या नशिबी आले होते. आर्थिक बाजू इतकी कमकुवत असल्यावर आजूबाजूचे, सखेसोयरे कोणीही उधार देखील द्यायला तयार होत नसत.

कसे बदलले नशीब?  नशीब कितीही खराब असलं तरी कोणी ना कोणी तारणहार मिळतोच. बाळासाहेबच्या बाबतीतही असेच घडले. त्याच गावातील गणेश कुलकर्णी नावाच्या त्याच्या मित्राने त्याला एक मोलाचा सल्ला दिला. शेवगाच्या शेंगांची झाडे लावण्याचा सल्ला.. पण बाळासाहेब त्या झाडाच्या बिया देखील खरेदी करू शकत नव्हता.

गणेश कुलकर्णींनी बाळासाहेब ला त्यासाठी ४ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आणि त्याचे नशीब पालटले..!! बाळासाहेबनी त्या पैशांतून शेवग्याची शेती केली. आणि पहिल्याच उत्पादनात त्याला ५० हजारांचा फायदा झाला. नंतर चार एकरात शेवगांची झाडे लावून नफ्यावर नफा कमवत त्याने स्वतःची परिस्थिती पूर्ण पालटून टाकली.

आता बाळासाहेबनी स्वतःची रोपांची नर्सरी सुरू केलीये बाकी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, त्यांना ह्या रोपांचा सप्लाय देखील तो करतो. त्याच्याच बरोबर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या परिस्थितीतून त्याने बाहेर काढले आहे. स्वतः १५ लाखांवर दार वर्षी उत्पन्न मिळवत आहे त्याच बरोबर इतर शेतकऱ्यांनाया देखील मदत करत आहे.

दिवसाला एका पोळीसाठी वणवण करणारा बाळासाहेब आता स्वतःच्या प्रशस्त बंगल्यात सधन शेतकरी म्हणून सुखात रहात आहे. गंमत म्हणजे ज्या रूपाने त्याला करोडपती बनवले त्या रोपाच्या कृतज्ञतेपोटी ‘शेवगाच्या शेंगा हातात घेऊन उभा असलेला शेतकरी’ असा पुतळा सुद्धा त्याने त्याच्या छतावर उभारला आहे.

बाळासाहेब पाटील या युवकांच्या परिश्रमांना योग्य तो पुरस्कार मिळून त्याचा गौरव ही करण्यात आला आहे. इतक्या कमी वयात सधनते कडे पाऊल टाकणारा शेतकरी म्हणून वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा आणि ड्रीम फाउंडेशन चा पूरस्कार त्याला मिळाला आहे. एवढेच काय तर ही शेती कशी करोडपती बनवेल ह्यावर त्याने ३ पुस्तके लिहिली आहेत.

शेवगा, पेरू, सिताफळे ह्या शेतीवर ही पुस्तके आहेत. अशा उत्तम पिकासाठी उत्तम बिया कशा बनवायच्या ह्या साठी लांबून लांबून शेतकरी, कृषितज्ञ बाळासाहेबकडे शिक्षण घ्यायला येतात. स्वतःच्या गावाला नवीन ओळख देणारा बाळासाहेब पाटील हा युवक सगक्या शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनलेला आहे.

आतापर्यंत त्याने १ लाखांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ह्याचा फायदा झाला आहे. एकेकाळी कर्जात असलेला हा शेतकरी आता लाखो करोडोंची उलाढाल करत आहे हे. कर्जबाजारी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी हा आदर्श नक्की घ्यावा. आणि नव्याने आपले जीवन पुन्हा सुरू करावे.

तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट कशी वाटली आम्हाला जरूर कळवा..!!

1 Comment
  1. GUNVANTIALURE lahade says

    Very nice courageous adorable

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!