Loading...

४ महिन्यात “तुळसी” मिळवून देऊ शकते लाखोंचे उत्पन्न; जाणून घ्या कशी करायची शेती.

9

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायद्याची शेती करायची असेल तर औषधी वनस्पतीची शेती करणे नेहमीच उत्तम. औषधी वनस्पतींची शेती करण्यासाठी न तुम्हाला मोठी जागा लागत आणि ना हि खूप मोठी गुंतवणूक. शेती ठेक्याने घेऊनही तुम्ही ही शेती करू शकता. यांचं पिक यायला ३ ते ६ महिने लागतात. त्यानंतर या वनस्पतींपासून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळायला लागते. जर तुम्ही तुळसीची शेती कराल तुम्हाला फक्त १५-२० हजारात ३ ते ४ लाख एवढं उत्पन्न होऊ शकते आणि तेही फक्त ३-४ महिन्यात.

तुळसी तशी धार्मिक कारणांमुळे माणसाशी जास्त जवळ जोडल्या गेली आहे. पण ते बाजूला सारले तर तुलसी या वनस्पतीचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत आणि म्हणूनच बाजारात तुळशीची खूप मागणी आहे. पूर्वीपासून अनके कंपन्याच्या तुळसीच्या तेलाचा वापर औषधी बनविण्यासाठी करीत आल्या आहेत. एप्रिल-मी महिन्यात तुळशीचे उत्पन्न घ्यायला सुरुवात करावी. अडीच एकरात १० किलो बिया लागतील आणि ८०-९० दिवसांत पिक तयार होते.

Loading...

१५-२० हजार रुपयांत सुरुवात: सेंट्रल इंस्‍टीट्यूट ऑफ मेडिसिनल एंड एरोमेटिक प्‍लांट (सीमैप) लखनऊच्या एका वैज्ञानिकाने म्हणजेच संजय सिंह यांनी सांगितलं आहे कि त्यांनी तुळसीची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. सौम्य. त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही भरगोस उत्पन्नही मिळते. या व्यतिरिक्त आरआरएलओपी-14 ही जातही लागवडीसाठी चांगली आहे. रितेश कुमार (शेतकरी, मप्र) यांचे असे म्हणणे आहे कि पिकासाठी १५-२० हजार रुपये खर्च येतो.

३ लाखांइतकं भरगोस उत्पन्न: तुळशीपासून दोन प्रकारचे फायदे आहेत. बिया आणि पाने. तुळसीच्या बियांना बाजारात सरळच विकल्या जाऊ शकते आणि पानांपासून तेल काढून त्यातून कमी केली जाऊ शकते. अडीच एकरात तुम्हाला १२० ते १५० किलो बियांचे उत्पन्न होऊ शकते. जर पिक चांगल असलं तर ते २०० किलो पर्यंत तेल सुद्धा निघू शकते. सध्या ७०० ते ८०० रुपये प्रती किलो तेलाचा भाव आहे. म्हणजे तुम्हाला सुमारे २ ते अडीच लाख रुपये तेलापासून मिळू शकतात.

Loading...

आपल्या प्राचीन चिकित्सापद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या चीन मध्ये तुळशीची खूप मागणी आहे. रिसर्च असो वा नवीन संशोधन, चायनीज वैज्ञानिक भरपूर प्रमाणात तुळशीला प्राधान्य देत आहेत. आर्टिमीशिया एन्‍नुआ या तुळशीपासून मलेरियावर औषधी बनविण्यात आली आहे. याशिवाय अडुळसा, एलोवेरा, हळद यांसारख्या पिकांचे उत्पन्न तुम्ही घेऊ शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कळवा आणि आवडला असेल तर शेयर करायला विसरू नका; तुम्ही शेयर केला तर मलाही वाटते आणखी-आणखी माहिती शोधून तुमच्यापर्यंत पोहचवावी.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

9 Comments
 1. Avatar
  Vaijnath Chandanwar says

  लेख खुपचं छान आहे, बरीच माहिती मिळाली पण , लागवडीसाठी लागणारी सामग्री व माहिती तंत्रज्ञान आणि मार्केटची माहिती दिली तर फार आभार

 2. Avatar
  Vaijnath Chandanwar says

  लेख खुपचं छान आहे, बरीच माहिती मिळाली पण , लागवडीसाठी लागणारी सामग्री व माहिती तंत्रज्ञान आणि मार्केटची माहिती दिली तर फार आभार
  8668290968

 3. Avatar
  Amol says

  Please tell the details about cultivation, collection.preparation and marketing . Manufacturer contact details.

 4. Avatar
  Ankush says

  Tulsi selling market kuth ahe ani kunala contact karayach..

 5. Avatar
  Akash Patekar says

  Excellent

 6. Avatar
  Rahul Hindu rao Chavan says

  I’m interested plz call me 9665320420

 7. Avatar
  Girish Khuje says

  There is no market for this

 8. Avatar
  तेजस देवकर says

  बियाणे कुठून मिळवावे शेती ची मशागत कशी करावी
  कोणत्या प्रकारची जमीन लागते पाणी किती द्यावे
  झाड पासून बिया वेगळे कसे करावेत
  तेल कसा तयार करायचं
  याची इतंभूत माहिती मिळावी ही विनंती
  8767778139 व्हाट्स ऍप्प

 9. Avatar
  sharad dhotre says

  nice blogs.
  but which company is purchesh this product.please give me more details.
  mob.no,.9881992614

Leave A Reply

Your email address will not be published.