Loading...

जगातील आठ सर्वोत्कृष्ट लढायांपैकी एक लढाई ! जेव्हा २१ शूर सैनिकांनी १०००० शत्रूंना रडवलं !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

सारागढी युद्धाची कथा –  सारागढीची लढाई सारागढीच्या लढाई ही एक महान कथा आहे, जेव्हा 21 बहादुर सैनिक 10,000 शत्रूंना लढले. आपण सर्वात प्रसिद्ध हॉलिवुड फिल्म 300 पाहिली असेल. हा चित्रपट एका ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. र्मोपयलेच्या युद्धामध्ये स्पार्टाचा राजा लियोनाइडस 300 शूर शिस्तप्रिय सैनिकांसह शौर्याने लढले, यावर चित्रपट आधारित आहे. 300 चित्रपट जोरदार हिट झाला आणि त्याचे स्पेशल इफेक्टस छान आहेत. जग सोडा, आपले भारतीय नायक पण काही कमी नाही. आपल्या भारतीय इतिहासात अशी एक मोठी कथा लपलेली आहे.

Loading...

ही कथा १९८७ मध्ये झालेल्या सारागढी युद्धाची  आहे. त्या युद्धात २१ शूर सैनिकांनी 10,000 अफगानींशी सामना केला होता. या युद्धावर २०१७ मध्ये Battle of Saragarhi चित्रपट देखील आलेला आहे. चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी असून, अभिनेता विक्रम मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमारची आगामी फिल्म केसरीही सारगढीच्या लढाईवर आधारित आहे.

सारागढीची लढाई  १२ सप्टेंबर १८९७ रोजी सारागढी नावाच्या ठिकाणी हे युद्ध लढले गेले. हे ठिकाण आज पाकिस्तानमध्ये आहे. त्या दिवशी १०००० अफगानींणी  तत्कालीन भारतीय सैन्याच्या सारागढी पोस्ट वर हल्ला केला.

किल्ल्यावरील आर्मी पोस्टवर २१ शीख सैनिक तैनात करण्यात आले. अफगाणांना वाटले की हि छोटी पोस्ट जिंकणे सहज शक्य होईल. पण हि त्यांची खूप मोठी चूक होती. त्यांना माहित नव्हते की हे शूर शीख मातीपासून बनलेले होते. त्या शूर सैनिकांनी पळ काढण्याऐवजी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. जेव्हा बंदुकीच्या गोळ्या संपल्या तेव्हा युद्ध तलवारीने लढले गेले. हे युद्ध इतके भयंकर होते की त्याचे उदाहरण आजपर्यंत दिले जाते.

सारागढ़ किल्ला युद्ध इतिहासकारांच्यामते हा इतिहासातील सर्वात मोठा लढा आहे. असे मत आहे की वीर योद्धा शेवटचा श्वास येईपर्यंत लढत असतो. मानव इतिहासामध्ये असे कोणतेही दुसरे उदाहरण नाही, जेव्हा अशी भयंकर लढाई लढली एली आहे. सारागढ़ युद्ध हे थर्मोपायलच्या युद्धाच्या समतुल्य मानले जाते.

अखेर त्या  सैनिकांना वीरगती मिळाली, परंतु ६०० हून अधिक अफगाण ठार करून ! अफगाण विजयी झाला, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. या युद्धाच्या दोन दिवसांनंतर ब्रिटीश सैन्याने पुन्हा हल्ला करून त्यावर कब्जा केला.

Loading...

Image Credit: shabdbeej.com त्या महान भारतीय सैनिकांना ब्रिटीश साम्राज्यामधून मरणोपरांत भारतीय ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार बहाल केला. हा पुरस्कार आजच्या परम वीर चक्र समतुल्य आहे. १२ सप्टेंबर रोजी सारागढी दिवस घोषित करण्यात आला आणि हा दिवस ब्रिटन, इंग्लंडमध्ये अजूनही दरवर्षी साजरा केला जातो. भारतात सिख रेजिमेंट हा दिवस रेजिमेंट बॅटल ऑनर्स डे म्हणून साजरा करतात.

आपल्या इतिहासात मुघल आणि अफगाणांच्या अत्याचारांच्या हल्ल्यांच्या कथा मोठ्या प्रमाणावर अभ्यासल्या गेल्या आहेत, पण या  युद्धाच्या साहसीपणाची या इतिहासात कोणतीही जागा नाही. त्याचप्रमाणे, जागतिक महायुद्धात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांची बहादुरी देखील विसरली गेली आहे.

आज, इंटरनेटच्या युगात, ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे, आपल्याला भारतीय इतिहासाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या विषयावरील अधिक माहितीसाठी, तुम्ही The Battle of Saragarhi : The Last Stand of 36th Sikh Regiment हे पुस्तक खरेदी करू शकता.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.