Loading...

बीडच्या ‘या’ आमदारामुळे शरद पवारांना फुटला होता घाम…

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

महाराष्ट्रात ९० साली काँग्रेसचे सरकार होते. या दशकात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजयी केले होते. त्यावेळी काँग्रेसचे विधानसभेसाठी १४१ आमदार उभे होते. विधानसभेच्या या निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आल्याने ही निवडणूक जास्तच रंगतदार झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे अनेक आमदार नवीन होते. मात्र असे असले तरी शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या डरकाळीने विधानसभा थरथरू लागली होती. 

याच दरम्यान सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा किस्सा माजी मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितला आहे. या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी राज्याचे बजेट मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरु होती. 

Loading...

अर्थसंकल्पाच्या चर्चा ह्या बऱ्याच कंटाळवाण्या असल्याने अनेक आमदार सभागृहात अनुपस्थित होते. या अनुपस्थित आमदारांमध्ये काँग्रेसच्या आमदारांचे प्रमाण अधिक होते. 

अशावेळी शिवसेनेचे बीडचे तरुण आमदार सुरेश नवले यांनी अवघ्या १ रुपया कपातीचा प्रस्ताव मांडला. विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सरकार कोसळणार होते. 

नवले यांच्या या प्रस्तावामुळे गाफील असलेले शरद पवार हादरले. त्यांनी तात्काळ एकएक आमदार धरून आणायला सुरुवात केली. तर एकीकडे विरोधी पक्ष नेते असलेल्या मनोहर जोशींनी भाजप, जनता दल अशा अनेक पक्षांना एकत्रित करून मोर्चाबांधणी सुरु केली. 

शिवसेना पक्षाचे प्रतोद असणाऱ्या सुभाष देसाई व गजानन किरीटकर यांनी विरोधकांचा गड समर्थपणे सांभाळला होता. शरद पवारांना १४१ आमदारांचे बहुमत असूनही या प्रस्तावामुळे मुख्यमंत्रीपद जाईल की काय? या विचाराने त्यांना घाम फुटला होता. 

Loading...

अशावेळी शरद पवारांनी आपली राजकारणातील सगळी चाणक्यनीती वापरली, मात्र त्यांना यातून मार्ग काही सापडेना. शिवसेना आमदारांनी सभापतींकडे मतदानाची मागणी केली. आमदारांच्या या मागणीमुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. 

त्यावेळी पीठासीन अधिकारी असलेले मधुकरराव चौधरी यांनी काहीही ऐकून न घेता सभा तहकूब केली. या सगळ्या नाट्यपूर्ण प्रसंगास जबाबदार असलेले सुरेश नवले हे सलग दोनवेळा बीडमध्ये आमदार म्हणून निवडून आले. पुढे ज्यावेळी युतीचे सरकार निवडून आले त्यावेळी त्यांना आरोग्य राज्यमंत्री पद मिळाले.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.