मृत पेशंटच्या मृत्यूची बातमी देण्याआधी हा डॉक्टर बघतो त्याची फेसबुक प्रोफाइल. कारण…

0

देवाचा पृथ्वीवरचा अवतार म्हणजे डॉक्टर असे आपण मानतो. रुग्णाची परिस्थिती नाजूक असल्यास आपण डॉक्टरांवरच सगळे सोपवतो. तेच आजारी असलेल्या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून काढतील असा आपला दृढ विश्वास असतो. पण कधी कधी डॉक्टर सुद्धा हतबल असतात. त्यांच्या प्रयत्नांना कायम यश मिळेलच असे नाही. ज्यांचा मृत्यू जेव्हा ठरलेला असतो तेव्हा तो येतोच.

पण तरीही डॉक्टर आपल्या प्रयत्नांची शर्थ करत असतात. कोणी रोगामुळे त्रस्त असतो तर कोणी हार्ट अटॅक मुळे शेवटची घटका मोजत असतो. कोणी ऍकसिडेंट मधून जीव वाचवण्यासाठी आणलेला असतो तर कोणी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात अर्धमेला झालेला असतो. कोणी दंगली, अत्याचारात अर्धमेला झालेला तर कोणी सासारच्यांच्या जाचाने जाळली गेलेली असते. असे कित्येक पेशंट रोज डॉक्टरना पाहावे लागतात. प्रत्येकावर योग्य तो उपचार, त्यांची अवस्था पाहून ठरवावा लागतो. स्वतःचे कौटुंबिक सुख, सण वार, मंगल कार्य, एवढंच काय तर घरातले मृत्यू सुद्धा बाजूला ठेवून समोर आलेल्या पेशंटला पहिले बघावे लागते.

एवढे सगळे असताना सगळ्यात अवघड कोणती गोष्ट असेल ती काळजी पूर्वक ट्रीटमेंट देऊन सुद्धा दगावलेला रुग्ण आणि ह्या गोष्टीची खबर त्याच्या आई वडिलांना, नातेवाईकांना देणे. कोणत्या आईला आवडेल तिच्या लेकराबद्दल असे ऐकायला..? किती कित्ती अवघड आहे हो हे. कसे सांगावे एखाद्या बापाला की हाताशी आलेला तुमचा लेक आता तुम्हाला परत बाबा म्हणण्यासाठी उठणार नाहीये. कसं सांगावं एखाद्या आईला की जिचे लग्न ठरलंय ती तुमची लेक ह्या ऍकसिडेंट मध्ये वाचू नाही शकली..??

काही डॉक्टर, प्रोफेशनचा भाग आहे म्हणून निर्विकार पणे हे सांगून मोकळे होतात. अर्थात त्यांना ही त्रास होतोच. पण हे रोजचे असल्यामुळे ते सरावतात. अशात एक अवलिया डॉक्टर लुईस प्रोफेटा मात्र, तरुण व्यक्ती जर मृत झाली तर त्या व्यक्तीला त्याच्या फेसबुक अकाउंट वरून जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. सेंट व्हिन्सेंट हॉस्पिटल – इंडियाना पुलीस मधील हे डॉक्टर एका ट्विट मध्ये एखाद्या मृत तरुण / तरुणीशी संवाद साधल्या प्रमाणे लिहितात,

‘तू जरी मृत झाला असलास / असलीस तरी तुझी ही बातमी तुझ्या घरच्यांना सांगण्यापूर्वी मी तुझी फेसबुक प्रोफाइल पाहणार आहे. ह्यामुळे मी डॉक्टर असलो तरी निर्विकार, बेदरकार नाही तर एक हळवं हृदय असलेला माणूस बनतो. तुझी प्रोफाइल पाहिल्यावर मला जाणवते की तू किती मजेने आयुष्य जगलास. पण मला मात्र आज तुझ्या आईवडिलांना मात्र दुखवावे लागेल. अजून ५ मिनिटांनी ते पूर्वी सारखे नसतील. कारण ते तुझा फक्त हाड माणसाचा निर्जीव देह बघतील, त्यांना अपार दुःख होईल, तुला जिवंत करावे ह्यासाठी ते प्रयत्न करतील पण त्याचा काहीही उपयोग नसेल.

मृत्यू समोर कोणाचे काय चालते..? मात्र अघटित मृत्यू, जो तू स्वतः ओढवून घेतला आहेस ह्या साठी मात्र माला तुझ्या वर राग येत आहे. का नाही आईबाबांच ऐकलस तू..?? कशाला हेल्मेट न घालता गेलास? तू ड्रिंक करून का कार चालवलीस..? का तू आईने सांगितल्यावर त्या मित्रमंडळींपासून लांब राहिलास.?? तुझ्या मृत्यू ला हे सगळे कारणीभूत ठरले. आता ह्या मृत्यूची खबर मात्र मला तुझ्या आईवडिलांना सांगावी लागत आहे. तुझे हे नवीन जॅकेट, नवीन कपडे, नवीन कानातले पाहून असे वाटते तू पुन्हा हे घालून आयुष्य जगायला उभा / उभी राहशील पण असे आता होणार नाहीये.

 

पण तुझे सुंदर आयुष्य मात्र मी फेसबुक वर पाहणार आहे. तू मित्रमंडळींना बरोबर साजरे केलेले जन्मदिवस, आजीबरोबर साजरा केलेला ख्रिस्तमस, आई वडिलांना मारलेल्या मोठ्यांचे फोटो बघून मला ह्याचा अंदाज येणारे की मला कोणाला तुझ्या मृत्यूची खबर द्यायची आहे. आणि त्यानंतर जे होणारे ते बघायला तू नाहीस हे नशीब. करण हे हृदय पिळवटून टाकणारे रडणे आणि ओरडणे बघणे खूप अवघड असते. पण तरीही तुझे फेसबुक पेज बघून माझ्या लक्षात हे राहील की मी फक्त एखाद्या पेशंट बद्दल नाही तर एका सुंदर आयुष्य जगलेल्या माणसाबद्दल, आईच्या, वडिलांच्या एका लेकराच्या मृत्यू बद्दल त्यांना सांगणार आहे.’

ह्या डॉक्टर चे हे ट्विट नक्कीच हृदय हेलावणारे आहे. मृत शरीरे पाहणे हे डॉक्टर चे रोजचे काम आहे पण तरीही माणुसकीच्या नात्याने आणि प्रेमाचा ओलावा ठेवून इतकी अवघड बातमी देण्यासाठी ह्या डॉक्टरने उचललेले पाऊल खूप हिमतीचे आहे. करण ह्यात यांत्रिक पण नसून अनोळखी माणसांना समजून घेण्याचा भाव आहे. एक प्रकारे त्या मृत जीवाला प्रेमाने आदरांजली वाहून शेवटचा निरोप अत्यंत सुंदरतेने देण्याचा खटाटोप आहे. अशा अवलिया डॉक्टरला स्टार मराठीचा सलाम..!!

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!