Loading...

नृत्यामुळे शरीराला होणारे हे फायदे वाचून चकित व्हाल!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मानवी जीवनामध्ये संगीत आणि नृत्याला कमालीचे महत्व आहे. कुठेही कानावर संगीत पडलं की आपले पाय आपोआप थिरकायला लागतात. पण करमणूकीच्या पलीकडे देखील नृत्य आपल्या साठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

खरंतर नृत्य आणि आरोग्य ह्यांची आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. पण त्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेण्याचा फारसा कोणी प्रयत्न केला नाही. भारतीय संस्कृती मध्ये प्रसिद्ध असणारे कथ्थक, भरतनाट्यम्, कथकली ही त्यातलीच काही उदाहरणे आहेत.

Loading...

महाराष्ट्रातदेखील तुम्ही पाहिलं तर मंगळागौर ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. ह्यामागे असलेला अध्यात्मिक आणि वैद्यकीय विचार पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. पूर्वीच्या काळी बायकांना घरात प्रचंड कामे असायची त्यातून त्यांचा व्यायाम तर व्हायचाच पण मंगळागौरीच्या निमित्ताने होणारा व्यायाम त्यांना शरीराला व मनाला देखील उपयोगी पडायचा.

नृत्याचे विविध प्रकार आहेत. ह्या विविध प्रकारांचा शरीराला वेगवेगळ्या पध्दतीने फायदा होतो. कथकमध्ये असणाऱ्या भावमुद्रांमुळे चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो तर ह्यात असलेल्या पायांच्या हालचालीमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

भरतनाट्यम् मध्ये असलेल्या जलद शारीरिक हालचाली रक्तप्रवाहास मदत करतात. तर अगदी अलीकडे पाश्चिमात्य देशातून आलेले पण आपल्याकडे स्थिरावत चाललेले नृत्य प्रकार म्हणजे बॅले आणि हिप-हॉप हे देखील शरीराची लवचिकता आणि हाड व सांध्यांचे आरोग्य वाढवण्यासाठी मदत करतात.

कशी होते नृत्याची शरीराला मदत?

  • मानसिक आरोग्य सुधारते

नृत्यामुळे मनाला समाधान मिळते. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ह्याची मदत होते. अनेक डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये संगीत आणि नृत्यामुळे सुधारणा पाहण्यात अली आहे.

  • हृदयाचे आरोग्य वाढवते

नृत्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे कार्य आणि आरोग्य वाढवण्यास हे मदत करते.

Loading...

  • बळ आणि ऊर्जा वाढवण्यास मदत

नृत्यामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे हाडे व स्नायूंचा व्यायाम होतो. ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. ऊर्जेच्या वाढीसाठी ह्याची मदत होते.

  • मेंदूसाठी फायदेशीर

नृत्यामुळे मेंदू चलाख होण्यास मदत होते. त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढवण्यास ह्याचा फायदा होतो. ह्यात असणाऱ्या विशिष्ट हालचालींमुळे शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे मोटर नर्व्हचे आरोग्य सुधारते.

  • वजन

वजन आणि शारीरिक आकार संतुलित ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

नृत्याआधी नेहमी शरीराला हायड्रेटेड ठेवा त्यासाठी भरपूर पाणी प्या. स्नायूंना इजा होऊ नये म्हणून आधी हातांचा व पायांचा योग्य व्यायाम करा.

भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.