तुम्हीही उशी घेऊन झोपता, जाणून घ्या उशी घेऊन झोपण्याची योग्य पद्धत, अन्यथा मानेला होऊ शकते इजा!

.

शरीराला आणि मेंदूला आराम देण्यासाठी असो, पोटभर जेवणानंतर हवीहवीशी वाटणारी वामकुक्षी असो किंवा दिवसभराचा कामाचा थकवा घालवण्यासाठी असो सुखाची झोप प्रत्येकाला प्रिय असते. रात्रीच्या शांत झोपेसाठी आरामदायक गादी, चांगल्या चादरी ह्याबरोबरच उत्तम उशी देखील महत्वाची भूमिका बजावते. काही लोकांना अगदीच पातळ तर काही लोकांना अगदी दोन-दोन उशा डोक्याखाली घेऊन झोपायची सवय असते तर काहींना उशी अजिबातच नको असते. चुकीच्या उशीचा वापर केल्याने अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्या आधीच योग्य उशीचा वापर सुरू करा.

चांगल्या झोपेसाठी आपले शरीर संरेखित करणे गरजेचे असते . डोके, मान, पाठीचा कणा, कूल्हे, अगदी गुडघे आणि टाचा देखील एका समान रेषेत असले पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला उठल्यावर वेदनांची जाणीव होणार नाही. तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कशी उशी वापरायला हवी हे ठरवता येते. जर तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर, अगदी पातळ उशी वापरण्याचा प्रयत्न करा किंवा अजिबात उशी वापरू नका. पोटावर झोपल्यामुळे तुमच्या पाठीच्या कण्यावर लक्षणीय ताण पडतो तसेच मान देखील मागे ओढल्या जाते ज्यामुळे एक विचित्र कोन मान आणि पाठीच्या कण्यात तयार होतो.

अशा प्रकारे झोपण्यामुळे मानेचे दुखणे जाणवू शकते. नॅशनल स्लीप फाऊंडेशन आरामासाठी पोटावर झोपण्याऐवजी आपल्या एका बाजूवर झोपायला सुचवते. अजिबात उशी न वापरता झोपण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. जर तुम्ही साइड स्लीपर (एका अडंगावर झोपणारे) असल्यास, अतिरिक्त रुंद आणि जाडी वाढविणार्या उशांचा वापर करा. या जोडलेल्या जाडीमुळे तुमचा खांद्दा आणि काना यातील अंतर भरण्यास मदत होते आणि डोके व मान यांना आधार मिळतो.

तुम्ही पाठीवर झोपत आवडत असल्यास, पातळ उशी विचारात घ्या. उशी पातळ ठेवल्यामुळे तुमची मान खूप पुढे किंवा खूप मागे वाकली जात नाही व एका रेषेत राहते. ह्यामुळे मानेला आराम मिळतो. उशीशिवाय झोपल्याने डोके सपाट राहू शकते. हे मानेवरील काही ताण कमी करते. हे फक्त पोटावर झोपणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.साईड स्लीपर किंवा पाठीवर झोपणाऱ्या लोकांनी उशीचा वापर केला नाही तर मानेसह पाठीच्या कण्यावर ताण येऊन वेदना जाणवू शकतात.