Loading...

“हे घर सायको नाहीये” – शर्मिष्ठा राउत | पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिताने दिले मोलाचे सल्ले ..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी सदस्यांना वेगवेगळे टास्क तर दिलेच पण त्याचसोबत त्यांची कानउघडणी केली आणि त्यांना त्यांच्या चुका देखील दाखवून दिल्या… याच बरोबर त्यांना मोलाचे सल्ले देखील दिले. पुष्करचे म्हणणे होते मला घरामध्ये यायला भीती वाटत होती. सईने सगळ्या सदस्यांना तिच्या मनातली एक गोष्ट सांगितली, “तुम्हांला या शोबद्दल, वाहिनीबद्दल खूप आदर आहे. तुम्ही आज या शोमध्ये आहात ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी अस कोणाला वाटत येथे ? या प्रश्नावर सगळ्याच सदस्यांनी होकार दिला.

पण सईचे म्हणणे होते आम्हांला तस काहीच दिसत नाही… याच गोष्टीला धरून पुढे शर्मिष्ठा म्हणाली, मी एका गोष्टीवरून खूप दुखावले, “ नेहा म्हणाली हे घर सायको आहे, विचित्र आहे”… तर तसं नाहीये, घर हे घरामध्ये रहाणाऱ्या लोकांमुळे बनत… तर तुम्ही सायको असाल. या घराने आम्हांला सगळ्यांनाच खूप काही दिले आहे… त्यामुळे या वास्तूविषयी, या घराविषयी, आणि बिग बॉस विषयी आम्ही कधीच ऐकून घेणार नाही ईथेपण नाही आणि बाहेर पण नाही. सईचे म्हणणे होते, तुम्ही अपमान करता आहात अस सगळे बोलून या कार्यक्रमाचा, बिग बॉसचा…

शर्मिष्ठाने पुढे असा मुद्दा देखील मांडला बिग बॉस हा गेम फक्त टास्क पुरता मर्यादित नसून ईथे नाती जोडली जातात… जी नाती आम्ही या घरामधून बाहेर गेल्यावर सुध्दा जपतो आहोत… स्मिता आमच्या टीममध्ये नव्हती तरी देखील आम्ही भेटतो, गप्पा मरतो.. इथे अजिबात दिसत नाही तस, नाती नाही, माणुसकी नाही नुसते टास्क खेळता तुम्ही… यावर स्मिता म्हणाली, मी यांच्या ग्रुप मध्ये नव्हते तरीदेखील मी आज यांच्यासोबत इकडे आले.. आम्ही देखील राडे केले, भांडलो, पण मला शंका आहे तुम्ही बाहेर गेल्यावर एकमेकांचे चेहरे बघाल. सई म्हणाली, मज्जा करा, खूप सुंदर घर आहे …स्मिताच म्हणण पडलं, जेवढ तुम्ही एन्जोय कराल तेवढ आम्ही एन्जोय करू”.

Loading...

Loading...

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.