पाकिस्तानवरील एअर स्ट्राईक चे मुख्य सूत्रधार बिरेंद्र सिंग धनोआ आहेत तरी कोण ?

0

१२ दिवसांपासुन देशात जे दु:ख आणि संताप पसरला होता तो थोडासा थंडावला आहे आणि त्यामागे कारणही तसंच आहे. उरी चित्रपटात म्हटल्याप्रमाणे “ये नया हिंदुस्तान है; ये घर में घुसेगा भी और मारेगा भी” या वाक्याला सिद्ध करण्यासाठी आपली वायुसेना कुठेच कमी पडली नाही. काल रात्री झालेल्या हल्ल्यात भारतीय वायुसेनेने पाकड्यांना चांगलाच चोप दिला आहे.

यासाठी संपूर्ण देशाला आणि वायुसेनेला खूप शुभेच्छा. यावेळी भारताने हवेतून सर्जिकल स्ट्राईक केली आणि त्या स्ट्राईकचे धागे-दोरे होते एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंह धनोआ यांच्या हाती. एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंह धनोआ हे सर्वोच श्रेणीचे सैनिक-पायलट आहे आणि कारगिल युद्धातील अनुभवी जवान आहे. २०१७ मध्ये त्यांनी अरूप राहा नंतर हे पद सांभाळले.

त्यांचा जन्म पंजाबच्या एसएएस नगरच्या घरौन गावात झाला. त्यांचे वडील सरयान सिंह त्यांच्या आयएएस अधिकारी करियरचा भाग म्हणून पंजाब सरकार आणि बिहार सरकारचे मुख्य सचिव होते. त्यांचे आजोबा त्या वेळी ब्रिटीश भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून द्वितीय विश्वयुद्धात सहभागी झाले होते.

करियरः त्यांनी देहरादून येथील नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश घेतला आणि तेथून पदवी प्राप्त केली. त्यांनी डिफेंस सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचा एक भाग म्हणून वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमधून देखील अभ्यास पूर्ण केला.

त्यानंतर जून 1978 मध्ये त्यांनी सैनिक पायलट म्हणून आपले करिअर सुरु केले. नंतर त्यांनी हवाई परिवहन इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. १९९९च्या युद्धातही त्यांनी वायुसेंच्या एका दलाला सांभाळून प्रमुख भूमिका बजावली आहे; 37 वर्षांच्या सेवांदरम्यान त्यांच्या अनेक प्रशासकीय आणि कार्यरत नेमणूकी केल्या गेल्या.

त्यांनी इंटेलीजेंससाठी मुख्य प्रशिक्षक आणि सहायक चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केले आहे. त्यांना त्यांच्या अप्रतिम कार्यासाठी १९९९मध्ये वायूसेना मेडल, युद्ध सेवा मेडल प्रदान करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडून २०१५मध्ये अति विशिष्ठ सेवा मेडलही देण्यात आले.

पुलवामा येथील हल्ल्याचा वचपा काढून भारतीय वायूसेनेने हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण इथे शांत बसून चालणार नाही; जो पर्यंत त्यांचा म्होरक्या ठार होत नाही तो पर्यंत भारताचा दहशतवादाशी लढा चालूच राहील

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!