Loading...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठिंबा, फडणवीस मुख्यमंत्री

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला.

शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दोन्ही नेते उत्तम काम करतील याची खात्री आहे, असं पंतप्रधानांनी दिली आहे.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत मोठा धक्का (NCP support BJP) देत भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे. आज (23 नोव्हेंबर) सकाळी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी आणि अजित पवार यांनी (NCP support BJP) उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा पेच सुटला आहे.

सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरिही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थीर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थीर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहू.”

अजित पवार म्हणाले, “शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.”

Loading...

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.