Loading...

ह्या चार गोष्टी रोज खा आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचे रुग्ण जणू सामान्य झाले आहेत. ह्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आणि रोज डझनभर गोळ्यांचा कंटाळा ह्यामुळे अजूनच समस्या निर्माण होतात पण आता काळजी नाही. प्रत्येकाच्या घरात मिळणाऱ्या ह्या चार गोष्टींचे सेवन सहज तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतील.

  • लसूण

Loading...

 

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी लसूण म्हणजे जणू अमृतच. लसणामध्ये ऍलिसीन नावाचे रसायन असते. हे रसायन शरीरात नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते. हे सिस्टोलीक आणि  डायास्टोलिक  दाब नियंत्रित करते. दररोज 10 mg  ऍलिसीन 11 mmHg सिस्टोलीक आणि 5 mmHg डायास्टोलिक एवढे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज एक तरी लसूण पाकळी खायला पाहिजे.

  • केळी

केळी उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. रोज दोन केळी 10% ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते.

  • शेवगा

Loading...

शेवगामध्ये शरीरासाठी लागणारे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पुरेशा प्रमाणात आढळतात. शेवगाच्या पानांचा रस रोज पिल्याने किंवा मसूर डाळीसोबत शेवगा खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. ह्यासोबतच शेवगा हाडे मजबूत करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी, रक्ताच्या शुद्धीकरणासाठी शेवगा मदत करते.

  • जवस

जवसामध्ये अल्फा लिनॉलेनिक ऍसिड असते. हे ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते. नियमित जवसाचे सेवन कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

-भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.