Loading...

१४ वर्षांच्या मुलीचं पोट अचानक दुखू लागलं. डॉ. यांनी चेक केल्यानंतर झाले सगळेच हैराण !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

चहाचे अनेक प्रकार दिसून येत आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी कोरा आणि दुधाचा चहा एवढाच तो माहीत असलेला चहाचा प्रकार. पण चहाचे अनेक प्रकार आहेत.आणि या अनेक प्रकारामध्ये जेवढे फायदे असतात तेवढेच तोटेही. बबल टी नावाच्या चहा मुळे काय होऊ शकतं पहा खालील वाचून.. चहाचे तुम्ही वेगवेगळे प्रकार ऐकले असतील.  ज्यात ग्रीन टी, ब्लॅक टी आणि हर्बल टी यांचा समावेश आहे.

Loading...

पण तुम्ही कधी बबल टी बाबत ऐकलं आहे का? हा एक नव्या प्रकारचा चहा असून याची क्रेझही चांगलीच वाढत आहे. खासकरूण तरूणाईमध्ये हा चहा अधिक लोकप्रिय आहे. पण या चहामुळे एका १४ वर्षीय मुलीला अडचणीत टाकलं आहे. ही घटना आहे चीनच्या झेजियांग प्रांतातील. इथे एका १४ वर्षीय मुलीला बबल टी पिण्याची सवय लागली होती. हा चहा पिल्याशिवाय तिला संतुष्टी मिळत नव्हती.

पण अचानक एक दिवस तिच्या पोटात जोरात वेदना होऊ लागल्या होत्या. त्यामुळे तिचे आई-वडील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत.    डॉक्टरांनी जेव्हा तिचं सिटी स्कॅन केलं तेव्हा तिच्या पोटात काही दिसलं. पोटातील वस्तू पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला तिच्या खाण्या-पिण्याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने सांगितले की, पाच दिवसांपूर्वी तिने एक कप बबल टी घेतली होती.

Loading...

पण डॉक्टर तिच्या बोलण्याने संतुष्ट झाले नाहीत. कारण तिच्या पोटात त्यांना १०० पेक्षा अधिक बबल टी बॉल्स आढळले. डॉक्टरांचा अंदाज होता की, ही मुलगी दररोज एक कप बबल टी सेवन करत असेल आणि त्यामुळेच तिच्या पोटात टॅपिओका बॉल्स जमा झालेत. बबल टी तयार करण्यासाठी त्यात गोलगोल टॅपिओका बॉल्स टाकले जातात. सोबतच त्यात थोडा बर्फ सुद्धा टाकला जातो. त्यामुळे या चहाला बबल टी म्हटलं जातं. दरम्यान, डॉक्टरांनी ऑपरेशन करून मुलीच्या पोटातील बॉल्स काढले.

सध्या तिची प्रकती ठिक आहे आणि तिला डॉक्टरांनी बबल टी पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. बबल टी मुळे होणारे दुष्परिणाम टाळावे व वेगवेगळ्या प्रकारच्या चहा घेण्याआधी त्याची योग्य ती माहिती घ्यावी. ही सर्वात मोठी गरज आहे.जी आपण आपल्या शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयोगात आणावी.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.