होळीची खासियत असलेली भांग सुद्धा फायदेशीर ठरते.. जाणून घ्या कशी ते..!

0

भारताच्या उत्तरेकडे “भांग” हे पेय होळीचे खास पेय म्हणून प्यायले जाते. त्यात अनेक प्रकारचा सुका मेवा एकत्र करून ते पेय तयार केले जायचे. पण ते पेय हे नशा आणणारे पेय म्हणून ओळखले जाते. जास्त प्रमाणात घेतले की शरीरावरचा ताबा जातो आणि माणूस एखाद्या दारुड्याप्रमाणे कुठेही लोळत पडतो, वायफळ बडबड करतो, दिवसभर शुद्धीत नसतो, म्हणून हे नशा करणाऱ्या लोकांचे पेय ठरले. आज सुद्धा ते वाईट म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. पण काही लोक होळीच्या सणाला हे पेय थोड्या प्रमाणात पितात. पण सगळे लोक पीत नाहीत. जे लोक कधीही मादक पदार्थांचे सेवन करत नाहीत ते ह्या पेयाला वाईटच समजतात.

पण ह्याच पेयात काही चांगले गुण सुद्धा आहेत हे कदाचित तुम्हाला माहितीही नसतील. भांगेचे ५ फायदे आहेत ते जाणून घेऊ या.
१- भांग प्यायल्यामुळे काही लोकांना डोकेदुखीचा खूप त्रास होतो. पण ह्याच भांगेमुळे डोकेदुखी नाहीशी पण केली जाते हा औषधी गुण आहे. भांगेच्या पानांचा अर्क काढून त्याचे दोन तीन थेंब जर कानात घातले तर ताबडतोब डोकेदुखी नाहीशी होते.

२- भांग औषध म्हणून वैद्याच्या सल्ल्याने औषधा एवढीच घेतली तर त्यामुळे आपली पचन क्रिया सुधारते. आणखी एक फायदा म्हणजे आपल्या शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर भांगेची पाने कुटून त्याचा लेप जखमेवर लावला की झटक्यात जखम बरी होते. आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जखम लवकर भरून येते.

३- भांग कमी प्रमाणात काही दिवस योग्य सल्ल्याने सेवन केल्यास शरीरात उत्साह निर्माण करते , तसेच कानाने कमी ऐकू येत असेल तर चांगले ऐकायला यायला लागते. आणि जर दृष्टी कमी झाली असेल तर हे औषध दृष्टीवर चांगला परिणाम करून चांगले दिसायला लागते. असा संवेदना जरूर करण्याचा चांगला परिणाम होतो.

४- भांगेची पाने चांगली कुटून त्याचा रस शरीरावर लावल्यास, कोरडी , रुक्ष झालेली त्वचा हळू हळू चमकदार व्हायला लागते, अशी चमकदार त्वचा कुणाला नको असेल? त्वचेसाठी आपण खूप सारे उपाय करतो , पण हा उपाय सुद्धा त्वचा तजेलदार बनवतो.

५- भांगेच्या बिया ह्या प्रोटीन, आणि २० अमिनो असिडस नी युक्त असतात. त्यामुळे भांगेच्या बियांचे योग्य प्रमाणात मिल्क शेक मध्ये वापर करून सेवन केले तर शरीरातल्या मांसपेशींची उत्तम वाढ आणि पोषण होते आणि शरीर अतिशय निरोगी आणि सुदृढ होते. म्हणून भरपूर व्यायाम करणारे पहिलवान बदाम, दूध आणि थोडी भांग एकत्र करून दुधाचे पेय घेतात त्यामुळे त्यांची ताकत वाढते. तालमीत व्यायाम करणारे पहिलवान ह्या पेयाचे नियमित सेवन करतात. शरीर धष्ट पुष्ट होण्यासाठी मदत होते.

असे आहेत “भांग” ह्या नशा येणाऱ्या पेयाचे चांगले फायदे. पण ते फायदे योग्य मार्गदर्शन घेऊनच घेतलेले बरे. पण कोरडी त्वचा चमकदार करण्यासाठी कोणीही ह्या पानांचा वापर कधीही करू शकतात. जखम झाली तर औषध म्हणून जखमेवर लावता येईल.

लेख सौजन्य  : सुधीर हसबनीस

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!