चांडाळ चौकडीच्या करामती मधील दारुड्याची भूमिका निभावणारे ‘बाळासाहेब’ आहे तरी कोण?

सध्या युट्युब चॅनेल वर वेबसिरीज बनवुन मनोरंजन करण्याचा अनेकांचा प्रयत्न दिसत आहे. काहींच्या बाबतीत तो यशस्वीपणे खरा उतरत आहे. पण काहींच्या गोष्टी फसत आहेत. हिंदी वेबसिरीज तर नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी वर उपलब्ध आहेत. पण मराठी मध्ये युट्युब वर अनेक जण त्या बनवत आहे. ग्रामीण कथा या साध्याच्या काळात खुप लोकप्रिय होत आहेत. गावाकडच्या गोष्टी ही सिरीज दोन वर्षांपूर्वी खुप गाजली होती.

आजही ती प्रेक्षकांना भेटायला येत असतेच. पण त्यावेळी मराठी मध्ये कुणी वेबसिरीज बनवत नव्हतं. गावाकडच्या गोष्टी ही सगळ्याजगामध्ये पोहचली. तेव्हा मात्र इतर अनेकांनी प्रयन्त केले. त्यामध्ये आज आपण प्रसिद्ध वेबसिरीज चांडाळ चौकडी मधील बाळासाहेब यांच्या बद्दल जाणुन घेणार आहोत. ही वेबसिरीज आणि त्यातील हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे.

वारकरी कुटूंबात जन्मलेले भरत शिंदे उर्फ बाळासाहेब हे किर्तनकार होते. बाळासाहेब यांचं खरं नाव भरत शिंदे आहे. त्यांची पत्नी ही माळकरी आहे. सोबत आज ती त्यांच्या गावाची सरपंच आहे. माळकरी, वारकरी आणि कीर्तनकार म्हंटलं की जगण्याला बंधनं येतात. बिनधास्त आयुष्य जगता येत नाही. विनोद किंवा अनेक गोष्टी वर बोलता येत नाही. पण भरत शिंदे यांचं मात्र वेगळं आहे. ते खुप बिनधास्त आहेत. गावात रॉयल माणुस म्हंटलं की त्यांचंच नाव आघाडीवर असतं.

जे अंगात आहे ते बाहेर काढलं की लोकांना आवडतं. असं म्हणणाऱ्या बाळासाहेब यांनी त्यांच्या आसपास घडलेल्या गोष्टी चांडाळ चौकडी च्या करामती या मराठी वेबसिरीज मधून बाहेर काढायचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू तो साऱ्या महाराष्ट्र मध्ये पोहचला. बाळासाहेब आज सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात आहेत.

कीर्तन म्हणजे सुद्धा एक प्रकारचा अभिनय कलाच आहे. तिथं सुद्धा अनेक ठिकाणी फिरून ते सिरीज व्हायच्या आधी कीर्तन करायचे. जेवढं आज ते बाळासाहेब हे पात्र अत्यंत जोरदार सादर करत आहेत तेवढं त्यांनी कीर्तन सुद्धा गाजवलेलं आहे. असा अवलिया अभिनेता अनेक गोष्टींमध्ये पारंगत आहे. यासोबत ते ग्रामपंचायत मध्ये गावातल्या जनतेची सरपंच म्हणून सुद्धा काम करून नित्यप्रमाणे सेवा ठरतात. आज त्यांच्या गावातल्या सर्वांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.

लोकांच्या विश्वासाला तडा न जाता शनिवारी रविवारी शूटिंग करून सोमवारी मंगळवारी एडिटिंग आणि बाकी उरलेले दिवस गाव आणि कुटुंब असं त्यांचं एकंदरीत नियोजन आहे. खचता आणि संघर्ष असल्याशिवाय यश मिळत नसतं. प्रयन्त करा. करत राहा. एक दिवस तुमचा असेल. असं बाळासाहेब यांचं म्हणणं आहे.

नीरा नदीच्या काठावर वसलेलं कामलिशवर हे त्यांचं गाव आहे. त्यांचं गाव निसर्गाच्या सौंदर्य दृष्टीने भरलेलं आहे. त्यामुळे गावात शूटिंग करायला कसलीच अडचण येत नाही. दोन चित्रपट शूटिंग होतील असं त्यांचं मोठं गाव आहे असं बाळासाहेब म्हणजेच भरत शिंदे सांगत आहेत.

ज्या व्यक्तीने कधी दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावला नाही त्याने दारुड्याची खुप उत्तम भूमिका केली आहे. अजूनही ती उत्तमोत्तम लोकप्रिय होत आहे. या हरहुन्नरी ह.भ.प अभिनेत्याला स्टार मराठी कडुन खुप शुभेच्छा !…

Credit Video : Sandy N yadav