“असं एक गाव…. जे चक्क वसलंय अख्खंच्या अख्खं एका गुहेत “

0

आत्तापर्यंत आपण ” खुल जा… सिम सिम ” असं म्हटल्यावर ,आलीबाबा साठी उघडणारी गुहा बालपणीच्या गोष्टींमध्ये ऐकली आहे .परंतु चीन मध्ये अशीही एक गुहा आहे, ज्या गुहेमध्ये वसलं आहे, आख्खंच्या अख्खं एक गाव. चीनच्या गुईझूू प्रांतातील शंभर वर्षापेक्षा जुने ‘झोंगदोंग’ नावाचे हे गाव , सध्या चर्चेचा विषय बनले आहे .पर्वतावरील विशाल गुहेमध्ये हे गाव वसले तरी कसे…? असा प्रश्‍न सर्वांनाच पडू शकतो.

एकोणिसाव्या शतकात जेव्हा लुटालूट करणाऱ्या लुटारू पासून आपला बचाव करावा लागत असे , तेव्हा काही लोकांनी स्वसंरक्षणासाठी या गुहेत वास्तव्य केले होते. तेच हे गुहेतील अजब गाव… आजही या गावात शंभराहून जास्त लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत .सध्या हे गाव यासाठी चर्चेचा विषय बनले आहे… की येथील प्रांतिक सरकारने गुहेतील सर्व गावकऱ्यांना हे गाव खाली करण्याचे फर्मान सुनावले आहे.

.परंतु या गावातील गावकरी हे गाव खाली करण्यास अजिबात तयार नाहीत. इतक्या वर्षांपासून वसलेले बस्तान सोडणे, त्यांना खूप त्रासदायक ठरत आहे. वाडवडिलांपासूनच्या आठवणी असलेलं, हे गाव सोडणं ,म्हणजे त्यांच्या मनाला असह्य वेदना देणारी गोष्ट आहे.

सध्या हे गुहेतील अजब गाव पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. सरकारने या गावकर्‍यांना दुसरीकडे अत्याधुनिक घरे देण्याचे आश्वासन दिले असले, तरी या गावातील कोणीच हे गाव सोडून तिथे राहायला जाण्यास तयार नाही. हे गुहागाव दोनशे तीस मीटर लांब व एकशे दहा मीटर रुंद आहे .

पर्वतामध्ये पाच हजार नऊशे फूट उंचीवर असणाऱ्या गुहेतते वसले आहे. सध्या येथे सुखात राहत असलेल्या गावकर्‍यांना मात्र, सरकार देत असलेल्या आलिशान घरांपेक्षा, आपले हे गुहा गावच स्वर्गाप्रमाणे वाटत आहे. अशी ही या अजब गावाची गजब कथा सुफळ संपूर्ण.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!