‘नारळ पाणी पिण्याचे’ आपल्या शरीराला किती फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

0

आपल्या रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींची आपल्याला संपूर्ण माहिती नसते, काही गोष्टी उडत उडत कानावरून जातात, तर काही आपल्याला नुसतं ऐकूनच आश्चर्य वाटतं. पण काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार असतो पण तो कोणता फायदा होणार हेच माहिती नसतं, त्यामुळे त्या गोष्टीबद्दल आपण एवढं काही सिरीयस घेत नाही.

पण जर फायदे कळले तर आश्चर्य तर वाटतंच पण ती गोष्ट मिळवण्याचा , वापरण्याचा, आपण निश्चितच प्रयत्न करतो. एखाद्या अशाच चांगल्या गोष्टीचा कोणी जर फुकट सल्ला दिला तर आपण अनुभव घेऊन बघतोच की. मग जाणूनच घ्या आता की जर तुम्ही नियमित नारळ पाणी प्यायला तर किती आणि कोणते फायदे तुम्हाला मिळतील. आहो, डाझनभर फायदे होतील.

नारळ पाण्याला अमृताची उपमा दिली जाते. कारण तितके फायदेच होतात ते पिण्यामुळे. पहिला फायदा कोणता? उन्हाळ्यात उष्णतेमुळे आपल्या शरीराचं तापमान पण वाढतं, आणि त्या मुळे उष्णतेचे विकार होऊ शकतात. हे शरीराचं तापमान जर कमी करायचं असेल तर आपण उन्हाळ्यात रोज नारळ पाणी पिणं फायदेशीर ठरतं. ताबडतोब शरीरातली उष्णता कमी करण्याची ताकत नारळ पाण्यात आहे. त्यामुळे थंडावा मिळून उष्णतेचे विकार होत नाहीत.

1- पचन शक्ती सुधारण्याची खूप मोठी ताकत नाराळपाण्यात आहे. पोटात काही गडबड वाटली तर लगेच नारळ पाणी प्यायल्यास निश्चितच फायदा होतो. पचन सुधारते. नियमित प्यायल्यास पोटाचे विकार कमी होत जातात. 2- खण्यापिण्यावर कंट्रोल नसेल तर आपलं वजन वाढायला लागतं. शरीर स्थूल व्हायला लागतं. पण वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तर नारळ पाणी चांगला उपाय म्हणून रोज प्यायले तर परिणाम जाणवतो. वजन वाढू न देण्याची शक्ती नारळ पाण्यात आहे.

3- किरकोळ कारणांनी आपण नेहमी नेहमी आजारी पडत असू तर हे लक्षण म्हणजे आपल्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. ही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम हे नारळ पाणी करते. म्हणून अशा लोकांनी नारळ पाणी नियमित घ्यावे. 4- सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे नारळ पाणी मधुमेहावर नियंत्रण सुद्धा ठेवतं. मधुमेह वाढू नये म्हणून नियमित नारळ पाणी पिणाऱ्यांना त्याचा फायदा होतो.

5- शरीरातल्या पेशींना सशक्त बनवण्याचं काम नारळ पाणी करतं, पेशीं मधले पोषक तत्व आणि ऑक्सिजन चे प्रमाण वाढते आणि ह्या पेशी सशक्त होतात. कोणत्याही रोगाचा प्रतिकार करू शकतात. 6- आपल्या शरीरातली पाण्याची पातळी योग्य राहण्यासाठी हे नारळपाणी खूपच मदत करतं. शरीराला डीटॉक्सिफाय करण्याचं काम हे नारळपाणी करत असतं, म्हणून नारळ पाणी नियमित घेणं फायद्याचं ठरतं.

7- पचन मार्ग साफ ठेवण्याचं महत्वाचं कार्य ह्या नारळ पाण्या मुळे होतं. म्हणूनच पचन कार्य चांगलं होतं. 8- आपल्या त्वचेचा पोत सुधारतो, म्हणजेच pH Value मध्ये सुधारणा होते, त्वचा चमकदार बनते. 9- किडनी स्टोन चा त्रास होत असलेल्या लोकांनी नेहमी नारळ पाणी त्यावरचा रामबाण उपाय म्हणून पिणे खूपच फायद्याचे ठरते.

असे सगळे फायदे, उपाय, हे फक्त नारळ पाणी सतत प्यायल्यामुळे होत असतील तर खरोखरच अमृत म्हणून ह्याचं सेवन करणं योग्यच ठरेल ना? आता उन्हाळा सुरू होतोय, मग ह्या अमृताचा आस्वाद घेऊन आपल्या शरीरातल्या अनेक व्याधींवर आपण निश्चितच विजय मिळवू शकतो. मग वाट कशाला बघायची? आजपासूनच सुरू करू ह्या जीवन संजीवनीचं सेवन.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!