भारतीय संघात पडली फूट ? रोहित शर्मा टीम च्या आधी एकटाच परतला मायदेशी !

0

क्रिकेट वर साऱ्या भारतीयाचं किती निसिमपणे प्रेम आहे हे साऱ्या जगाला माहितेय. त्यात भारत सेमीफायनल ला म्हंटल्यावर तर अजूनच मजा. क्रिकेट प्रेमी आस लावून बसले होते की भारत फायनल ला जाईल. आणि पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून विजयाचा दावेदार बनेल. पण सगळ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. सगळं काही उलटं घडलं. भारत न्युझीलंड कडून १८ रनाने पराभूत झाला. सगळा भारत त्या क्षणाला भावुक झाला होता. याच सोबत सगळे भारतीय खेळाडू सुद्धा रडत होते. त्यात सगळ्यात जास्त दुःख झालं ते रोहित शर्मा ला.

त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत न्हवते. त्यालाही पराभव पचत न्हवता. आणि मॅच संपल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. भारतीय संघात दोन गट निर्माण झाले आहेत. एक विराट कोहलीचा आणि दुसरा रोहितचा. एक कर्णधार तर दुसरा उपकर्णधार. विराट कोहलीला कॅपटन शिप जमली नाही असं काही माजी खेळाडू यांचं मत आहे. भारताचा कर्णधार आता रोहित शर्मा ला करा अशी प्रतिक्रिया वासिम जाफर या माजी खेळाडू ने दिली.

वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये १८ धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारतावर विजय मिळवून न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताच्या पराभवाने सर्वांनाच दु:ख झालं. मात्र, यात सर्वात जास्त निराश झाला तो हिटमॅन रोहित शर्मा. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा लपून राहिली नव्हती. याशिवाय भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीसुद्धा बाद झाल्यानंतर मैदानावरच भावनिक झालेला दिसला.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतकं आणि एक अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माला सेमीफायनलमध्ये फक्त एक धाव करता आली. साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे आघाडीचे फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध ढेपाळले. यानंतर आता रोहित शर्मा मुंबईत पोहचला आहे. अद्याप भारतीय संघ इंग्लंडमध्येच असल्याचं समजतं.

सगळयांना मागे टाकून मायदेशी परतणाऱ्या रोहित शर्मा ला पाहून देशातल्या अनेक क्रिकेट प्रेमींना भारतीय संघात फूट पडली आहे का यावरून प्रश्न पडला आहे ? भारतीय संघात फूट पडणं किंवा गट निर्माण होण ही काही नवीन गोष्ट नाही. गौतम गंभीर ,वीरेंद्र सेहवाग आणि धोनी यांचा ही असेच गट पडले होते. भारतीय टीम ला जर खरंच अभिमान वाटेल देशाला असा खेळ खेळायचा असेल तर टीम ला एकीचं बळ दाखवून खेळावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!